महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; आईच्या मृतदेहासोबत खेळत होती जुळी मुलं, भावूक करणारा क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 09:42 AM2021-04-12T09:42:11+5:302021-04-12T09:42:24+5:30

पुनिता देवी याठिकाणी नवरा आणि सासूसोबत राहत होती. तिला दीड वर्षाची जुळी मुलं आहेत. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Mother Of Twin Child Committed Suicide By Hanging Himself In Sector 6 Police Station Area Of Ranchi | महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; आईच्या मृतदेहासोबत खेळत होती जुळी मुलं, भावूक करणारा क्षण

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; आईच्या मृतदेहासोबत खेळत होती जुळी मुलं, भावूक करणारा क्षण

googlenewsNext

झारखंड – राज्याची राजधानी रांचीच्या सेक्टर ६ मध्ये एका जुळ्या मुलांच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. ३१ वर्षीय पत्नी तिच्या नवऱ्यासोबत याठिकाणी राहत होती. नवरा रेल्वेत कामाला होता. नवरा सूरज प्रकाश बोकारो रेल्वे स्टेशनवर नोकरी करत होता. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पोस्टमोर्टमला पाठवला आहे.

माहितीनुसार, पुनिता देवी याठिकाणी नवरा आणि सासूसोबत राहत होती. तिला दीड वर्षाची जुळी मुलं आहेत. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नवरा रात्री ड्युटी करण्यासाठी बोकारो रेल्वे स्टेशनला गेला होता. सकाळी मुलं उठून आईसोबत खेळत होती. त्याचवेळी वृद्ध सासू सकाळी बाहेर फिरण्यासाठी गेली. जेव्हा नवरा कामावरून घरी परतला तेव्हा त्याने मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकला. तर रुममध्ये आतमधून दरवाजा बंद होता.

अनेक प्रयत्नानंतर दरवाजा उघडून पाहिला तेव्हा आतमधील दृश्य पाहून नवऱ्याला धक्काच बसला. रुममध्ये बायको पंख्याला लटकताना दिसली. शेजाऱ्यांच्या मदतीनं तिचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. दोन्ही चिमुरडे आईच्या मिठीत खेळत राहिले. आईचा आवाज न आल्याने ते दोघंही रडू लागले. हे पाहून उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. नवरा आणि सासू यांना रडू आवरलं नाही.

घटनास्थळी पोहचलेले तपास अधिकारी विक्रांत मुंडा म्हणाले की, प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचा संशय वाटतो. मयताचे पती ड्यूटी करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले होते. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी होईल. त्यानंतर पुढील निष्कर्ष काढला जाईल असं पोलिसांनी सांगितले.

Web Title: Mother Of Twin Child Committed Suicide By Hanging Himself In Sector 6 Police Station Area Of Ranchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस