अनेक वर्षाचं गुपित बाहेर पडलं, मुलीच्या पायाखालची जमीन सरकली; DNA चाचणीनं हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 09:35 AM2022-05-19T09:35:12+5:302022-05-19T09:35:28+5:30
बेरिन एन नावाच्या महिलेने पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदवली आहे. कौटुंबिक वादातून बेरिनसमोर असं सत्य उघड झाले जे गेल्या अनेक वर्षापासून तिच्यापासून लपवून ठेवलं होते
एका मुलीनं अशा व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ज्याच्या सावलीखाली ती लहानाची मोठी झाली. वडील म्हणून ते तिला प्रेम करायचे. या व्यक्तीविरुद्ध मुलीच्या हाती असं काही लागले ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली. या व्यक्तीने तिच्या खऱ्या वडिलांची हत्या केली होती हे सत्य इतक्या वर्षांनी तिला कळालं. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला.
हे प्रकरण तुर्की येथील आहे. स्थानिक वृत्तानुसार, बेरिन एन नावाच्या महिलेने पोलीस ठाण्यात एक तक्रार नोंदवली आहे. कौटुंबिक वादातून बेरिनसमोर असं सत्य उघड झाले जे गेल्या अनेक वर्षापासून तिच्यापासून लपवून ठेवलं होते. तिच्या आईचे परपरुषासोबत संबंध होते. याच संबंधातून ती महिला गर्भवती राहिली आणि तिने एका मुलीने जन्म दिला. त्या मुलीचं नाव बेरिन ठेवण्यात आले. आजपर्यंत बेरिनला तिच्या आईचे पती माहिर ए हेच तिचे खरे पिता वाटत होते. परंतु सावत्र बहिणीने वादातून हे सत्य बेरिनसमोर उघड केले. तिच्या आईचा प्रियकर मुस्तफा तिचे वडील आहेत असे बेरिनला समजलं.
हे सत्य उघड होताच बेरिनने माहिर ए यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात Denial Of Lineage आरोपाखाली गुन्हा नोंदवला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने DNA चाचणीचे आदेश दिले. या चाचणीत बेरिन आणि माहिर यांचे रिपोर्ट जुळले नाहीत. त्यानंतर बेरिनने तिचे खरे वडील मुस्तफा यांच्याविरोधात पॅटरनिटी सूट याचिका कोर्टात दाखल केली. पॅटरनिटी सूट हे असं कोर्ट प्रकरण असतं. ज्यात मुलाच्या वडिलांचा शोध घेतला जातो. बेरिनच्या मागणीनंतर मुस्तफाची कबर खोदून त्याचीही DNA चाचणी करण्यात येणार आहे.
बेरिनच्या आईचा मृत्यू काही वर्षापूर्वी झाला होता. परंतु तिने कधीही हे सत्य तिच्या मुलीसमोर उघड केले नाही. रिपोर्टनुसार, बेरिनला स्वत:ची मुलगी मानून माहिरनं तिला लहानाचं मोठं केले. परंतु एकेदिवशी त्याला बेरिनच्या आईवर संशय आला. माहिरने बेरिनच्या आईचा पाठलाग केला. तेव्हा ती गावातील एका शेतात मुस्तफासोबत रंगेहाथ पकडली गेली. त्यानंतर माहिरने मुस्तफाला मारून टाकलं. माहिरने पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. ही घटना घडली तेव्हा बेरिन ९ वर्षाची होती.