दोन वर्षे फ्रीजमध्ये दडवून ठेवला आईचा मृतदेह, ६९ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 06:58 AM2023-02-05T06:58:11+5:302023-02-05T06:58:44+5:30

या आठवड्याच्या प्रारंभी शिकागोतील एका अपार्टमेंटच्या तळघरातील डीप फ्रीजरमध्ये इव्हाची आई रेजिना मिकाल्स्की (९६) यांच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले होते.

Mother's body hidden in fridge for two years, case registered against 69-year-old woman | दोन वर्षे फ्रीजमध्ये दडवून ठेवला आईचा मृतदेह, ६९ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

दोन वर्षे फ्रीजमध्ये दडवून ठेवला आईचा मृतदेह, ६९ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

googlenewsNext

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एका महिलेने आईचा मृतदेह दोन वर्षे फ्रीजरमध्ये दडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, इव्हा ब्रॅचर (६९) असे तिचे नाव आहे. ती इलिनॉइस प्रांतातील रहिवासी आहे. आईचा मृत्यू लपविल्याचा व बनावट ओळखपत्र बाळगल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ब्रॅचर गुरुवारी न्यायालयात हजर झाली. 

या आठवड्याच्या प्रारंभी शिकागोतील एका अपार्टमेंटच्या तळघरातील डीप फ्रीजरमध्ये इव्हाची आई रेजिना मिकाल्स्की (९६) यांच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले होते. ब्रॅचरने आईच्या निधनानंतर त्यांचे सामाजिक सुरक्षा लाभ व इतर लाभ लाटले काय याचा पोलिस तपास करत आहेत. 

‘आईला प्रेम नाही’ -
‘माझ्या आईला प्रेम नाही. अगदी स्वतःवरही नाही. माणुसकीवर प्रेम नाही. इतर कोणावरही प्रेम नाही,’ अशी प्रतिक्रिया ब्रॅचरची मुलगी आणि मिकाल्स्की यांची नात सबरिना वॉटसन यांनी व्यक्त केली. 

Web Title: Mother's body hidden in fridge for two years, case registered against 69-year-old woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.