१० दिवस घरात पडला होता आईचा मृतदेह; तिच्यासोबतच राहिली मुलगी, अखेर असा झाला प्रकार उघड...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 06:53 PM2022-05-21T18:53:53+5:302022-05-21T18:55:01+5:30
Deadbody Found : माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील कारवाई सुरू आहे.
लखनऊमध्ये एक मुलगी १० दिवस आईच्या मृतदेहासोबत घरात बसून राहिली. वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून मुलगी घरातच असल्याचे परिसरातील रहिवाशांना समजले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील कारवाई सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मधील सेवानिवृत्त अभियंता सुनीता दीक्षित, इंदिरा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील मयूर रेसिडेन्सी बंगला क्रमांक-२६ मध्ये आपली अवघी 26 वर्षांची मुलगी अंकितासोबत राहत होती. ती कर्करोगाने त्रस्त होती आणि १० वर्षांपूर्वी पती रजनीश दीक्षितपासून घटस्फोट घेतला.
गेल्या १० दिवसांपासून सुनीता आणि तिच्या मुलीची हालचाल स्थानिकांना दिसली नाही. दरम्यान, घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घरात पोहोचलेल्या पोलिसांनी पाहिले की मुलगी अंकिता एका खोलीत होती, तर तिची आई सुनीता दुसऱ्या खोलीत बंद होती. पोलिसांनी खोलीची चावी मागितली असता मुलीने ती दिली नाही.
मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच बंगल्याबाहेर लोक जमा झाले.
यादरम्यान पोलीस दरवाजा तोडून आत पोहोचले, तेव्हा महिलेचा मृतदेह पडलेला आढळून आला. सुमारे दहा दिवस जुना मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
एक मुलगा भेटायला आला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि मुलीमध्ये वारंवार भांडणे होत होती. चौकशीत मुलीने सांगितले की, एक मुलगा आईला भेटायला यायचा, यावरून मुलगी आणि आईमध्ये भांडण व्हायचे. मात्र, पोलिसांना मृतदेहाजवळून काही काचेचे तुकडेही सापडले आहेत. या प्रकरणात जादूटोण्याच्या अँगलने तपास केला जात आहे. मात्र मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोणतीही जखम नाही
पोलीस आयुक्त डीके ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह सापडला आहे, याची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी दिली आहे. मृतदेह सुमारे 10 दिवसांपूर्वीचा होता. प्राथमिक चौकशीत अद्यापपर्यंत शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळून आल्या नाहीत. मात्र, मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.