"आई झोपलीय..."; 5 दिवस लेकाने घरात लपवला मृतदेह, दुर्गंधी येऊ नये म्हणून लावायचा धूप, अगरबत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 02:20 PM2022-12-14T14:20:58+5:302022-12-14T14:35:11+5:30
एका मुलाने आपल्या 82 वर्षांच्या आईचा मृतदेह घरातील बेडखाली तब्बल पाच दिवस ठेवल्याची भयंकर घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून समोर आलेल्या खळबळजनक प्रकरणाने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका मुलाने आपल्या 82 वर्षांच्या आईचा मृतदेह घरातील बेडखाली तब्बल पाच दिवस ठेवल्याची भयंकर घटना घडली आहे. घरातून दुर्गंधी आल्याने कॉलनीतील लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरच्या शिवपूर शाहबाजगंज कॉलनीत ही घटना घडली आहे.
एका 45 वर्षीय मुलाने आपल्या 82 वर्षीय आईचा मृतदेह घरामध्ये लपवून ठेवला होता. दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून घरात धूप आणि अगरबत्ती लावायचा. काही लोकांना ही वृद्ध महिला अनेक दिवस दिसली नाही, तेव्हा कॉलनीतील लोकांनी त्याच्या मुलाला विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, आई झोपली आहे. यानंतर कॉलनीतील लोकांना मृतदेहाचा वास आल्यावर कॉलनीतील त्यांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. निखिल मिश्रा असं या मुलाचं नाव होतं.
निखिल मिश्राला सुरुवातीपासूनच ड्रग्जचे व्यसन होते. तो रात्रंदिवस दारूच्या नशेत असायचा. 20 वर्षांपूर्वी त्याचा कुसुमशी विवाह झाला असून त्याला दोन मुलं आहेत. निखिल मिश्राची आई शांती देवी यांचं चार दिवसांपूर्वी निधन झालं होतं, मात्र त्याने मृतदेह घरात लपवून ठेवला. त्याने त्याच्या आईला अन्न आणि पाणीही दिले नव्हते. कॉलनीतील रहिवाशांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी निखिलच्या आईचं हाड तुटले होते, त्यामुळे ती बेडवरच राहायची. कॉलनीतील लोकांनी जाऊन तिला भाकरी दिली तर ती खायची.
निखिल मिश्रा इतका मनोरुग्ण होता की त्याने कॉलनीतील रहिवाशांनाही घरात प्रवेश दिला नाही. माहिती मिळताच पोलीस निखिल मिश्राच्या घरी पोहोचले तेव्हा तो पोलिसांना घरातही जाऊ देत नव्हता. कॉलनीतील लोकही काही बोलले तर तो संतापायचा. पोलिसांनी आई कुठे आहे असे विचारले असता मुलाने सांगितले की आई झोपली आहे. मात्र पोलीस आत गेल्यावर पोलिसांना शांतीदेवीचा मृतदेह सापडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"