शवाघरात पोहोचला मांत्रिक अन् म्हणाला...'मृतदेह बाहेर काढा, मी जीवंत करतो'; कुटुंबीयही तयार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 09:39 AM2022-03-07T09:39:33+5:302022-03-07T09:40:10+5:30

मध्य प्रदेशच्या दमोह येथे जिल्हा रुग्णालयात एका मांत्रिक खूप नौटंकी केली. दमोहच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या सोनू आदिवासीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.

mp damoh tantric morgue take out dead body make alive after uproar gate opened then | शवाघरात पोहोचला मांत्रिक अन् म्हणाला...'मृतदेह बाहेर काढा, मी जीवंत करतो'; कुटुंबीयही तयार!

शवाघरात पोहोचला मांत्रिक अन् म्हणाला...'मृतदेह बाहेर काढा, मी जीवंत करतो'; कुटुंबीयही तयार!

googlenewsNext

दमोह-

मध्य प्रदेशच्या दमोह येथे जिल्हा रुग्णालयात एका मांत्रिक खूप नौटंकी केली. दमोहच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या सोनू आदिवासीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याचा मृतदेह शवविच्छेदनानंतर जिल्हा रुग्णालयातील शवाघरात ठेवला होता. त्यानंतर कुटुंबीय घरी निघून गेले. पण काही वेळानं एका मांत्रिकाला घेऊन ते रुग्णालयात पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे करू लागले. 

कुटुंबीयांनी त्यांच्यासोबत एक मांत्रिकाला आणलं होतं आणि मांत्रिकाकडे मृतदेहाला जीवंत करण्याची शक्ती असल्याचा दावा करु लागले. आता काही मिनिटं शिल्लक आहेत. अजूनही मृतदेह बाहेर काढला तर मी त्याला जीवंत करू शकतो असा दावा मांत्रिक करू लागला. मृतदेहाच्या कुटुंबीयांनी मांत्रिकाच्या म्हणण्यावर इतका विश्वास ठेवला की ते रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांशीही वाद घालू लागले. शवाघरातून मृतदेह बाहेर काढण्याची मागणी करू लागले. जेव्हा त्यांचं कुणी ऐकलं नाही तेव्हा त्या ढोंगी मांत्रिकानं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि थेट शवाघराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले पण तेही मांत्रिकाचा तमाशा पाहात राहिले. 

कुटुंबीयांच्या मागणीवर शवाघर उघडलं
काही वेळानंतर कुटुंबीयांच्या आग्रहानंतर शवाघराचा दरवाजा उघडला गेला आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बहिणीनं मृतदेह पाहिला. मृतदेह बाहेर काढावा जेणेकरुन मांत्रिक त्याला जीवंत करु शकतील अशी मागणी ती करू लागली. पण प्रशासनानं त्याची परवानगी दिली नाही. मांत्रिक मात्र शवाघराबाहेर नौटंकी करत राहिला. अखेरीस पोलिसांनी शवाघर बंद केलं आणि कुटुंबीयांना घरी जाण्यास सांगितलं. त्यानंतर मांत्रित देखील गपचूप तिथून निघून गेला. 

Web Title: mp damoh tantric morgue take out dead body make alive after uproar gate opened then

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.