पगार 10 हजार, खात्यात 16 लाख, 4 पत्नींसोबत संसार; मंत्र्याच्या गॅस एजन्सीचा मॅनेजर झाला करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 08:18 PM2022-09-18T20:18:40+5:302022-09-18T20:23:54+5:30
बिंशू भालेराव असं या आरोपीचं नाव असून तो सध्या फरार आहे, तो मंत्री शाह आणि कुटुंबाशी अत्यंत निष्ठावान होता. परंतु त्याला गॅस एजन्सीतून महिन्याला 10 हजार रुपये पगार मिळत होता आणि आता तो कोट्यधीश झाला आहे.
मध्यप्रदेश सरकारमधील वन मंत्री विजय शाह यांची गृहनगर खंडवामध्ये दिव्य शक्ती या नावाने गॅस एजन्सी आहे. मात्र आता एजन्सीच्या सहाय्यक व्यवस्थापकाने बनावट कागदपत्रांद्वारे 16 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवला. बिंशू भालेराव असं या आरोपीचं नाव असून तो सध्या फरार आहे, तो मंत्री शाह आणि कुटुंबाशी अत्यंत निष्ठावान होता. परंतु त्याला गॅस एजन्सीतून महिन्याला 10 हजार रुपये पगार मिळत होता आणि आता तो कोट्यधीश झाला आहे.
वन मंत्री विजय शाह यांच्या दिव्य शक्ती या गॅस एजन्सीची मॅनेजर ही मंत्र्याची सून पद्मिनी दिव्यादित्य आहे. रामनगर येथे राहणारे बिंशू भालेराव हा एजन्सीत असिस्टेंट मॅनेजर होता. गॅस एजन्सीचे कर्मचारी सुभाष केसनियाने शुक्रवारी रात्री त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. सांगितलं की, एजन्सीत अनेक वर्षांपासून काम करणारे असिस्टंट मॅनेजर बिंशू भालेरावने 1 एप्रिल 2020 पासून 16 सप्टेंबर 2022 पर्यंत कुटरचना करीत एजन्सीच्या खात्यातून लाखो रुपये काढले.
सध्या बिंशूविरोधात पोलीस ठाण्यात फ्रॉड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वन मंत्री विजय शाह यांच्या गॅस एजन्सीचे असिस्टंट मॅनेजर बिंशू भालेरावला दरमहिना दहा हजार रुपये पगार मिळतो. त्याच्या खात्यात 16 लाखांहून अधिक रक्कम होती. याशिवाय शहरातील प्रसिद्ध भागात दीड कोटींचं घर आहे. त्याच्य़ा कमाईचं स्त्रोत गॅस एजन्सी व्यतिरिक्त दुसरं कोणतंही नाही. अवघ्या 10 हजार रुपयांच्या पगारात बिंशू चार पत्नींचा सांभाळ करतो. खंडवा आणि इंदूरमध्ये विविध भागात त्याच्या पत्नी राहतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.