धक्कादायक! ५ वर्षापूर्वी ज्या दिरासोबत मिळून पतीची हत्या केली; आज त्याच दिराला वहिनीनं संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 09:16 AM2021-05-30T09:16:13+5:302021-05-30T09:17:27+5:30
भोपाळच्या कोलार येथील ही घटना आहे. शुक्रवारी एका अज्ञात युवकाचा मृतदेह रस्त्याच्या किनारी पडलेला सापडला होता.
भोपाळ – मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका हत्येची अशी घटना समोर आली आहे ते समोर येताच पोलीसही हैराण झाले आहेत. दिराची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तेव्हा तिने ५ वर्षापूर्वी केलेल्या हत्याकांडाचा उलगडा केला आहे. पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात तिने ५ वर्षापूर्वी दिरासोबत मिळून पतीची हत्या केली होती आणि आता त्याच दिराची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
भोपाळच्या कोलार येथील ही घटना आहे. शुक्रवारी एका अज्ञात युवकाचा मृतदेह रस्त्याच्या किनारी पडलेला सापडला होता. पोलिसांनी जेव्हा या घटनेची चौकशी केली तेव्हा हा मृतदेह दामाखेडा येथील झोपडपट्टीत राहणारा मोहन नावाच्या व्यक्तीचा असल्याचं समजलं. जो त्याची वहिनी आणि तिच्या मुलासोबत राहत होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी मृतकाच्या वहिनीला ताब्यात घेतलं. तेव्हा तिने केवळ दिराच्या हत्येचीच नाही तर ५ वर्षापूर्वी केलेल्या पतीच्या हत्येचाही उलगडा केला.
या महिलेने कबुल केलं की, ५ वर्षापूर्वी तिने दिरासोबत मिळून तिच्या पतीची हत्या केली होती. त्यानंतर पतीचा मृतदेह घरातच दफन केला होता. महिलेच्या जबाबानंतर पोलिसांनी शनिवारी रात्री झोपडपट्टीतील घरात खड्डा करून पाहिलं तर त्यातून मानवी अवशेष सापडले. जे पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार ५ वर्षापूर्वी महिलेने दिरासोबत राहण्यासाठी त्याच्यासोबत मिळून पतीची हत्या केली त्यानंतर त्याचा मृतदेह घरातच खड्डा करून पुरण्यात आला.
तेव्हापासून ही महिला मुलगा आणि दिरासोबत राहत होती. परंतु मागील काही दिवसांपासून दिरासोबत तिचे वारंवार वाद सुरू होते. ज्यामुळे तिने त्रस्त होऊन मुलाच्या मदतीने दिर मोहनची हत्या केली. त्यानंतर महिलेच्या मुलाने मोहनचा मृतदेह कलियासोत नदीच्या किनारी फेकला. ज्याठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी काही जनावरं हा मृतदेह खात असल्याचं निदर्शनास आलं. या घटनेनंतर तातडीनं पोलिसांना पाचारण करण्यात आले. २४ तासांच्या आत पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन या हत्येचा उलगडा केला.