Mukesh Ambani bomb scare : मलाच माहिती नाही, आताच कळालं मी तिकडे चाललो; सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया
By पूनम अपराज | Updated: March 5, 2021 22:31 IST2021-03-05T22:30:45+5:302021-03-05T22:31:40+5:30
Mukesh Ambani bomb scare : वाझे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळून लावले.

Mukesh Ambani bomb scare : मलाच माहिती नाही, आताच कळालं मी तिकडे चाललो; सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया
मुंब्रा खाडी येथे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असलेले मनसुख हिरण (५०) हे ठाण्यातील याच विकास पाम इमारतीच्या ए विंगमधील चौदाव्या मजल्यावर वास्तव्यास होते. मनसुख मृत्यू प्रकरणाबाबत मला काहीच माहीत नाही. आता माहिती मिळाल्यानंतर मी तिकडेच जायला निघालो आहे, असा दावा चकमक फेम सचिन वाझे यांनी केला आहे. आता ते कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तेथे दाखल झाले असल्याची माहिती भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली. हिरेन यांचा मृतदेह या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. तसेच वाझे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळून लावले.
Mukesh Ambani bomb scare : माझे पती आत्महत्या करूच शकत नाही; मृत्यूची सखोल चौकशी व्हावी
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीमालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे हे प्रत्येक यांच्यावर या प्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यावर सचिन वाझे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मनसुख हिरण यांचं काय झालं मला काहीच माहीत नाही. मला आताच कळलंय. मी ठाण्यालाच चाललो आहे, असं वाझे म्हणाले, अशी माहिती टीव्ही ९ने दिली आहे.