Mukesh Ambani bomb scare: पोस्टमोर्टम रिपोर्टवर मनसुख हिरेन कुटुंबीय समाधानी नाही; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 04:23 PM2021-03-06T16:23:08+5:302021-03-06T16:30:25+5:30

Mansukh Hiren Death Controversy: मनसुख हिरेन यांची हत्या झाली आहे, त्याची चौकशी झालीच पाहिजे. तोंडात रुमाल कोंबलेले होते, ही आत्महत्या आहे हे कुणालाच पटणार नाही

Mukesh Ambani bomb scare: Mansukh Hiren family not satisfied with postmortem report | Mukesh Ambani bomb scare: पोस्टमोर्टम रिपोर्टवर मनसुख हिरेन कुटुंबीय समाधानी नाही; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Mukesh Ambani bomb scare: पोस्टमोर्टम रिपोर्टवर मनसुख हिरेन कुटुंबीय समाधानी नाही; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Next
ठळक मुद्देजोपर्यंत अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर येणार नाही तोपर्यत पुढचा निर्णय घेणार नाहीजे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवीमनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांना जी काही मदत लागेल ती आम्ही सर्व करणार आहोत

ठाणे – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलीस कुटुंबीयांना विनंती करत आहेत.

याबाबत ठाणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष देवीलाल जैन म्हणाले की, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, ते समाजाचे चांगले कार्यकर्ते होते, त्यांना कोणतंही व्यसन नव्हतं, मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांना जी काही मदत लागेल ती आम्ही सर्व करणार आहोत असं त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातल्या ४ आत्महत्या अन् ठाकरे सरकारभोवती संशयाचं वातावरण; प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य

तसेच मनसुख हिरेन यांची हत्या झाली आहे, त्याची चौकशी झालीच पाहिजे. तोंडात रुमाल कोंबलेले होते, ही आत्महत्या आहे हे कुणालाच पटणार नाही, जोपर्यंत अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर येणार नाही तोपर्यत पुढचा निर्णय घेणार नाही, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, घरातून इतके रूमाल कोण घेऊ जाऊ शकतं. चौकशी पूर्ण होत नाही मग आत्महत्या कसं म्हणू शकतं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली परंतु समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबीयांनी मांडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप खांबे यांनी दिली आहे.

शवविच्छेदन अहवाल समोर

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मनसुख हिरेन यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्याचा अहवाल ठाणे पोलिसांना मिळाला आहे. हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे. हिरेन यांचा व्हिसेरा पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे. हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानं त्यांचे कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेतील. असं पोलिसांनी सांगितलं होतं.

मृत्यूची सखोल चौकशी व्हावी

माझे पती आत्महत्या करूच शकत नाही, ते पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करत होते, गेल्या ८ दिवसांपासून त्यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावलं, काल सुद्धा पोलिसांनी हिरण यांना बोलावलं. कांदिवली क्राईम ब्रँचचे तावडे नावाच्या पोलिसाचा फोन आला. त्या पोलिसाने घोडबंदर येथे भेटायला बोलावले. मनसुख तिकडे गेले त्यानंतर रात्री १० वाजल्यानंतर मनसुख हिरेन यांचा फोन बंद झाला. मात्र आज बातमी कळली की, त्यांचा मृतदेह मुंब्रा येथे सापडला. पोलिसांकड़ून जेव्हा जेव्हा त्यांना बोलावले तेव्हा त्यांच्याकड़ून सहकार्य करण्यात येत होते. त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त चुकीचे आहे. कारण ते कधीच तणावात नव्हते. आयुष्यात असाही दिवस येईल असं स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पत्नी विमल हिरण यांनी केली आहे.

अत्यंत गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक हे प्रकरण

मनसुख हिरण यांचा मृतदेह सापडल्याने हे प्रकरण विधिमंडळातही गाजलं, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणावरून तपास अधिकारी सचिन वाझेंबद्दल शंका उपस्थित केली, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून गृहमंत्री अनिल देशमुख(Home Minister Anil Deshmukh) या प्रकरणावर भाष्य का करत नाहीत, हे प्रकरण NIA कडे सोपवण्यात यावं. (Devendra Fadnavis Demands Handling over Probe into Car Found Near Mukesh Ambani's House to NIA) तसेच यापुढे जात देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे की, जून आणि जुलै २०२० मध्ये याच गाडी मालकासोबत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं संभाषण झाल्याचा सीडीआर आहे, गाडी मालक आणि सचिन वाझे हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते का? असा प्रश्न उपस्थित त्यांनी विचारला.

Read in English

Web Title: Mukesh Ambani bomb scare: Mansukh Hiren family not satisfied with postmortem report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.