Mukesh Ambani Bomb Scare: तिहार जेलमधील खतरनाक दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 09:16 AM2021-03-12T09:16:05+5:302021-03-12T09:18:17+5:30

Mansukh Hiren case: सुरक्षा दलांनी जेल नंबर-8 मध्ये छापा टाकला. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीनच्या बराकीमधून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याच मोबाईलवरून टेलिग्राम चॅनेल अॅक्टिव्हेट करण्यात आला होता.

Mukesh Ambani Bomb Scare: Mobile seized from terrorist Tehseen Akhtar in Tihar Jail | Mukesh Ambani Bomb Scare: तिहार जेलमधील खतरनाक दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल जप्त

Mukesh Ambani Bomb Scare: तिहार जेलमधील खतरनाक दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल जप्त

Next

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणाची (Mukesh Ambani Bomb Scare) लिंक दिल्लीच्या तिहार जेलपर्यंत लागल्याने गुरुवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत तुरुंगात छापेमारी करण्यात आली. यामध्ये खतरनाक दहशतवादी तहसीन अख्तरच्या बराकीतून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. (Mobile seized from Tihar jail in mukesh ambani bomb scare case.) 


सुरक्षा दलांनी जेल नंबर-8 मध्ये छापा टाकला. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीनच्या बराकीमधून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याच मोबाईलवरून टेलिग्राम चॅनेल अॅक्टिव्हेट करण्यात आला होता. तहसीन अख्तर हा पटनाच्या गांधी मैदानातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये बॉम्ब स्फोट, हैदराबाद बॉम्बस्फोट आणि बोधगया बॉम्बस्फोटामध्ये सहभागी होता. 


तहसीन अख्तरच्या बराकीमध्ये जो मोबाईल जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये टोर ब्राऊजरद्वारे व्हर्च्युअल नंबर बनविण्यात आला होता. याच नंबरवरून टेलिग्राम अकाऊंट बनविण्यात आले होते. यानंतर धमक्यांचे पोस्टर तयार करण्यात आले. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशन सेल तहसीन अख्तरला रिमांडवर घेून चौकशी करणार आहे. 




याचबरोबर आणखी एक मोबाईल नंबर पोलिसांच्या रडारवर आहे. हा नंबर सप्टेंबरमध्ये अॅक्टिव्हेट झाला होता. जो नंतर बंद करण्यात आला. दोन मोबाईल नंबर खोट्या कागदपत्रांवर खासकरून तिहार जेलमध्ये असलेल्या गुन्हेगारांसाठी खरेदी करण्यात आले होते. 
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी टेलीग्राम चॅनेल तयार करण्यात आले होते आणि  अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ ठेवल्याची जबाबदारी घेणारी मेसेज २७ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अंबानींच्या टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर पोस्ट करण्यात आला होता. या मेसेजमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे पाठवण्याची मागणी देखील केली होती आणि ती जमा करण्यासाठीच्या लिंकचा उल्लेख केला होता.


चौकशीदरम्यान ती लिंक “उपलब्ध नाही” म्हणून आढळले, त्यामुळे तपास करणार्‍यांना हे कोणीतरी त्रास देण्यासाठी कृत्य करत असल्याचा संशय आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नंतर २८ फेब्रुवारीला जैश-उल-हिंदचा आणखी एक मेसेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आला आणि घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला गेला. 
या प्रकरणातील तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता. नंतर गृहमंत्र्यांनी याचा तपास एटीएसकडे सुपूर्द केला. त्यानंतर देखील या प्रकरणाचा तपास एटीएसकडून केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या NIA कडे वळविण्यात आला आहे. 

Read in English

Web Title: Mukesh Ambani Bomb Scare: Mobile seized from terrorist Tehseen Akhtar in Tihar Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.