९ दिवसांआधीच झालं होतं लग्न, माहेरी येऊन प्रियकरासोबत केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 11:17 AM2021-06-26T11:17:28+5:302021-06-26T11:23:30+5:30
पोलिसांना लगेच घटनेची माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली. ही घटना पंजाबच्या मुक्तसर साहिबच्या किल्लियांवाली गावातील आहे.
९ दिवसांआधी लग्न झालेली १९ वर्षीय तरूणी जेव्हा लग्नानंतरर पहिल्यांदा आपल्या माहेरी आली तेव्हा तिने प्रियकरासोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांनीही घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टॅंकमध्ये उडी घेत आत्महत्या केली. ही घटना घडल्यावर गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांना लगेच घटनेची माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी चौकशी सुरू केली. ही घटना पंजाबच्या मुक्तसर साहिबच्या किल्लियांवाली गावातील आहे.
लग्नाला काहीच दिवस झाले होते आणि १९ वर्षीय तरूणी सासरहून माहेरी आली होती. त्यावेळी ती प्रियकरासोबत बोलली आणि दोघांनी मिळून स्वत:चं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तरूणीचा परिवार तिला शोधत होता. अशात त्यांना समजलं की, तरूणी आणि गावातीलच तिच्या प्रियकराने पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली. (हे पण वाचा : बोंबला! पैशांच्या नादात पतीने भाऊ बनून पत्नीचं दुसऱ्यासोबत लावून दिलं लग्न आणि मग...)
आत्महत्येआधी तरूणीने तिच्या लग्नातील नवीन बांगड्या तोडल्या. यानंतर आपल्या प्रेयसीसोबत पाण्याच्या टाकीत उडी घेत आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, तरूण आणि तरूणीने आपल्या प्रेमाबाबत परिवारांना सांगितलं नव्हतं. या घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तरूणी सकाळीच दुकानातून सामान आणते असं सांगून घरातून गेली होती आणि परत आलीच नाही. शोधाशोध केल्यावर दोघांचाही मृतदेह गावातील पाण्याच्या टाकीत आढळून आले. पोलिसांना कळवण्यात आल्यावर दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले.