पुण्यात भरदिवसा 'मुळशी पॅटर्न'फेम थरार! रस्त्यावर पाठलाग करत दोघांवर धारदार शस्त्राने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 23:52 IST2020-12-25T21:42:02+5:302020-12-25T23:52:04+5:30
एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी

पुण्यात भरदिवसा 'मुळशी पॅटर्न'फेम थरार! रस्त्यावर पाठलाग करत दोघांवर धारदार शस्त्राने वार
पुणे (धनकवडी) : बिबवेवाडी येथील गंगाधाम रस्त्यावर पाठलाग करत दोघांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी अकराच्या सुमारास ऐन वर्दळीच्या वेळी घडली. बिबवेवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सलीम मेहबूब शेख, (वय २४) व तौफिक शेख( वय २७) मृत्यू झालेेल्या व्यक्तीची नावे आहेेेत. या प्रकरणी पोलीसांनी एकास ताब्यात घेतले असून हा खून पुर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आरोपी व मृत यांच्यामध्ये पुर्वी पासून वाद होते. आज सकाळीही त्यांच्यात वाद झाला आणि या वादातून ही घटना घडली. मृत व आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. अनेकदा ते मद्यपान करण्यास एकत्र बसत होते. यातूनच त्यांच्यात वाद होत होते. सलीम व तौफिक मुख्य रस्त्यापासून आतल्या रस्त्याकडे जात असताना आरोपी अचानक त्यांच्यामागून आला. त्याने दोघांनाही काही समजायच्या आतच पालघनसारख्या हत्याराने त्यांच्यावर वार केले. हे वार वर्मी लागल्याने सलीमचा जागेवरच मृत्यू झाला तर तोहफिकला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे व पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तत्काळ घटनास्त्थळी दाखल झाले होते.