२० वर्षापासून फरार गँगस्टरला चीनमध्ये केली अटक; मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 03:19 PM2024-03-23T15:19:53+5:302024-03-23T15:20:39+5:30

Gangster Prasad Pujari arrested: प्रसाद पुजारी हा भारतातून फरार होऊन चीनला गेला होता. भारतीय तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी गँगस्टरने चीनी महिलेसोबत लग्न केले

Mumbai Crime Branch deports gangster Prasad Pujari from China | २० वर्षापासून फरार गँगस्टरला चीनमध्ये केली अटक; मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी

२० वर्षापासून फरार गँगस्टरला चीनमध्ये केली अटक; मुंबई पोलिसांची दमदार कामगिरी

मुंबई - कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला चीनहून मुंबईत आणण्यात आलं आहे. गेल्या २० वर्षापासून तो फरार होता. त्याच्याविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. प्रसाद पुजारीवर मुंबईत हत्या, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात २०२० मध्ये अखेरचा गुन्हा मुंबईत नोंद झाला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या या ऑपरेशनवर विशेष लक्ष ठेवले होते. 

प्रसाद पुजारी हा भारतातून फरार होऊन चीनला गेला होता. भारतीय तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी गँगस्टरने चीनी महिलेसोबत लग्न केले होते. त्याला १ मुलगाही आहे. पुजारीच्या आईला २०२० मध्ये मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्रसाद पुजारीला चीनहून मुंबईत आणलं. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. 

कोण आहे प्रसाद पुजारी? 
प्रसाद पुजारीवर एकूण ८ गुन्हे 
ज्यात हत्या, खंडणी वसुली आणि फायरिंगचे गुन्हे
४ गुन्ह्यात त्याच्यावर मकोका लावलाय 
त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी होती
प्रसाद पुजारी हा छोटा राजन गॅंगचा हस्तक 
गँगस्टर प्रसाद पुजारीची पोलीस कोठडी दरम्यानच्या चौकशीत अनेक खुलासे होण्याची शक्यता

शिवसेना नेत्यावर केला होता गोळीबार

प्रसाद पुजारीने विक्रोळी परिसरात राहणाऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत जाधव यांच्यावर गोळीबार केला होता. १९ डिसेंबर २०१९ मध्ये ही घटना घडली होती. फायरिंगमध्ये चंद्रकांत जाधव थोडक्यात वाचले होते. 

दरम्यान, मार्च २००८ मध्ये प्रसाद पुजारीला चीनमध्ये तात्पुरते वास्तव्य मिळाले होते, त्याची मुदत मार्च २०१२ मध्ये संपली होती. प्रवासी व्हिसावर पुजारी चीनला गेला होता. सध्या पुजारी लुओहू जिल्हा, शेनझेन शहर आणि चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात राहत होता. 
 

Web Title: Mumbai Crime Branch deports gangster Prasad Pujari from China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.