मुंबईतून मोठी बातमी! BKCमधून सुरु होतं कोट्यवधींचं ड्रग्ज रॅकेट; १० कोटींची एमडी जप्त

By मनीषा म्हात्रे | Published: March 20, 2023 09:48 PM2023-03-20T21:48:05+5:302023-03-20T21:48:24+5:30

गुन्हे शाखेची कारवाई

Mumbai Crime Branch Police busted drug racket worth crores operated from BKC rupees 10 crores MD seized | मुंबईतून मोठी बातमी! BKCमधून सुरु होतं कोट्यवधींचं ड्रग्ज रॅकेट; १० कोटींची एमडी जप्त

मुंबईतून मोठी बातमी! BKCमधून सुरु होतं कोट्यवधींचं ड्रग्ज रॅकेट; १० कोटींची एमडी जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वांद्रे पुर्वेकडील वांद्रे -कुर्ला संकूल (बीकेसी) येथून चालणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना बेड्या ठोकण्यास अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी पथकाला यश आले आहे. त्रिकूटाकडून १० कोटींचे ५ किलो १९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी कमरुद्दीन शेख, रियाज अन्सारी आणि सलमान खान या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. सलमान हा जामिनावर बाहेर असताना ड्रग्ज तस्करीत सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, बीकेसी परिसरात मोठ्याप्रमाणात ड्रग्ज साठा करण्यात आला असून येथून मोठ्या  ड्रग्ज खरेदी-विक्री आणि पुरवठा केला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे वरळी युनिटचे प्रभारी पोनि संदिप काळे, सपोनि संतोष साळुंखे, सपोनि अमोल कदम, पोउपनि शैलेश देसाई, पोउपनि रविंद्र सावंत आणि पथकाने शुक्रवारी रात्री बीकेसी परिसरात गस्त सुरु केली. बीकेसी अग्निशमन केंद्राजवळ तीन संशयित या पथकाला दिसले. पथकाने सापळा रचून कमरुद्दीन, रियाज आणि सलमान या तिघांनाही ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये यातील कमरुद्दीन आणि रियाज यांच्याजवळ १६० ग्रॅम एमडी पोलिसांना सापडले. याप्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
            कमरुद्दीन आणि रियाज यांना सलमान याने हे ड्रग्ज पुरवले असल्याची माहिती गुन्ह्याच्या तपासात समोर आली. त्यानुसार पोलिसांनी बीकेसी येथेच छापेमारी करुन सलमानने लपवून ठेवलेले आणखी ४ किलो ७४९ ग्रॅम एमडी जप्त केले.  याप्रकरणी अटक आरोपींकडे अधिक तपास सुरु आहे.
...
सलमान अभिलेखावरील आरोपी
सलमान हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात २०२१ मध्ये नागपुरमध्ये वाणिज्य स्वरूपाचा गुन्हा दाखल होता.  या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर पडल्यानंतर तो ड्रग्ज विक्रीच्या व्यवसायात सक्रीय झाल्याची माहिती गुन्हेशाखेच्या तपासात समोर आली आहे. त्यानुसार या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तिन्ही आरोपींकडे कसून चाैकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Mumbai Crime Branch Police busted drug racket worth crores operated from BKC rupees 10 crores MD seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.