रवी पुजारीला मुंबईत आणण्याच्या प्रक्रियेला वेग, मुंबई गुन्हे शाखेने कोर्टाकडून मागितले प्रॉडक्शन वॉरंट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 11:01 PM2020-07-03T23:01:09+5:302020-07-03T23:04:25+5:30
या गुंडांविरोधात २६ गुन्हे महाराष्ट्र नियोजित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल आहेत. रवी पुजारी यांच्याविरोधात ११ प्रकरणात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कुख्यात गुंड रवी पुजारी याच्याविरोधातील प्रॉडक्शन वॉरंटची मागणी केली आहे. रवि पुजारी सध्या कर्नाटकपोलिसांच्या ताब्यात आहे. हा अर्ज मुंबईतील मोक्का कोर्टात वर्ग करण्यात आला आहे. मुंबईत रवी पुजारीविरूद्ध ४९ हून अधिक गुन्हे दाखल आहेत, ज्यात खून आणि खंडणी प्रकरणांचा समावेश आहे. या गुंडांविरोधात २६ गुन्हे महाराष्ट्र नियोजित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल आहेत. रवी पुजारी यांच्याविरोधात ११ प्रकरणात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे.
रवी पुजारी यांच्याविरूद्ध मुंबई तसेच आसपासच्या जिल्ह्यात अनेक खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारी यांना फेब्रुवारीमध्ये पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथून प्रत्यार्पण करण्यात आले. कर्नाटकपोलिसांनी गँगस्टर रवीला ताब्यात घेतले आहे. कर्नाटकमध्येही राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ७५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
कोठडी मिळण्यास विलंब होऊ शकतो
मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्याची मागणी कर्नाटक कोर्टात पोहोचली आहे. मात्र,वॉरंट एक किंवा दोन दिवसात जारी केला जाईल. पोलिसांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, रवी पुजारी यांना मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यास आणखी काही कालावधी लागू शकेल, कारण त्याच्यावर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
रवी पुजारीला प्रत्यार्पण करण्यात आले
रवी पुजारी यांना सेनेगलची राजधानी डकार येथील नाव्हाच्या दुकानातून पकडण्यात आले होते. ही भारतीय गुप्तचर संस्था, मुंबई गुन्हे शाखा आणि गुजरात एटीएसने पुरविलेल्या माहितीनुसार कारवाई करण्या आली होती. रवी पुजारी थायलंड, मलेशिया आणि मोरोक्को दरम्यान लपला होता. नंतर पश्चिम आफ्रिकी देशांमध्ये बुर्किना फासो, डीआरसी (डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो), गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगलकडे त्याने बस्तान वळवले. त्याने आपली ओळखही बदलली होती आणि अँटनी फर्नांडिजच्या नावाखाली जगायला सुरुवात केली. मुंबईत खंडणीसंदर्भातील शेवटचा कॉल रवी पुजारीने १५ जानेवारी २०१९ रोजी केला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ
लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ
अॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह
कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार
धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती
पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ
नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला