65 वर्षीय वृद्धाला करायचं होतं लग्न, व्हिडीओ कॉल केला अन् लागला 60 लाख रूपयांचा चूना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 03:11 PM2023-02-13T15:11:34+5:302023-02-13T15:12:41+5:30

Crime News : गुन्हे शाखेच्या सायबर सेलमध्ये दाखल आपल्या तक्रारीत दावा त्यांनी दावा केला आहे की, महिलेने एका व्हिडीओ कॉलदरम्यान त्यांना अश्लील गोष्टी करण्यास सांगितल्या.

Mumbai crime news : 65 years old man registered on matrimonial website made a video call and then got cheated of 60 lakhs | 65 वर्षीय वृद्धाला करायचं होतं लग्न, व्हिडीओ कॉल केला अन् लागला 60 लाख रूपयांचा चूना

65 वर्षीय वृद्धाला करायचं होतं लग्न, व्हिडीओ कॉल केला अन् लागला 60 लाख रूपयांचा चूना

googlenewsNext

Crime News : महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मुंबईमध्ये एका व्यक्ती ब्लॅकमेल करून 65 लाख रूपये लुटल्याची घटना समोर आली आहे. लग्न जुळवणाऱ्या एका वेबसाइटवर प्रोफाईल असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीने कथित लैंगिक शोषण केल्यावरून एका महिलेला 60 लाख रूपये दिले.

गुन्हे शाखेच्या सायबर सेलमध्ये दाखल आपल्या तक्रारीत दावा त्यांनी दावा केला आहे की, महिलेने एका व्हिडीओ कॉलदरम्यान त्यांना अश्लील गोष्टी करण्यास सांगितल्या. ज्यानंतर महिलेने त्यांच्या या गोष्टी रेकॉर्ड केल्या. त्यानंतर हा व्हिडीओ ओळखीच्या लोकांना पाठवण्याची धमकी दिली.

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, एक वृद्ध व्यक्ती आपल्यासाठी साथीदार शोधत होती. त्यासाठी त्याने वेबसाईटवर त्याची आईडी बनवली होती. पोर्टलवर त्यांची भेट एका महिलेसोबत झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि चॅंटींग सुरू केली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एका व्हिडीओ कॉल दरम्यान महिलेने कपडे काढले आणि अश्लील वर्तन केलं. त्या महिलेने समोरच्या व्यक्तीलाही असंच करण्यास सांगितलं. ज्यानंतर वृद्ध व्यक्तीने महिलेच्या सांगण्यानुसार, कपडे काढले. पण या व्यक्तीला हे माहीत नव्हतं की, महिला याचं रेकॉर्डिंग करत आहे. 

या व्यक्तीचा कपडे काढण्याचा व्हिडीओ महिलेने रेकॉर्ड केल्यानंतर महिलेने त्यांना ब्लॅकमेल करणं सुरू केलं. तिने पैशांची मागणी केली. असं केलं नाही तर महिलेने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. ती असंही म्हणाली की, तुझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर हा व्हिडीओ पाठवला जाईल. पोलीस म्हणाले की, यातून वाचवण्यासाठी वृद्ध व्यक्तीने महिलेला काही पैसे ट्रांसफर केले.

Web Title: Mumbai crime news : 65 years old man registered on matrimonial website made a video call and then got cheated of 60 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.