Mumbai CST Bridge Collapse : अखेर 6 निष्पाप जीवांच्या मृत्यूस जबाबदार 'स्ट्रक्चरल ऑडिटर' अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 08:44 PM2019-03-18T20:44:35+5:302019-03-18T20:48:06+5:30
नीरजकुमार देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई - हिमालय पूल दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटताच पालिका प्रशासनाने तत्काळ स्ट्रक्चरल आॅडिटर, ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई केली. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र वाचविण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. त्यातच आज पोलिसांनी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाईला चुकीचा अहवाल दिल्याचा ठपका ठेवत आज अटक करण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी माहिती दिली. नीरजकुमार देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आझाद मैदान पोलिसांनी पूल दुर्घटनेदिवशी रात्री उशीरा याप्रकरणी पादचारी पूलाची देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी जबाबदार संबंधीत यंत्रणा, संस्था आणि त्याच्यासंबंधीत सर्व पदाधिकारी, व्यक्तींविरोधात भादंवी कलम ३०४ (अ), 337 आणि 338 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. त्यात आरोपींवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला होता.
Mumbai bridge collapse: Neeraj Desai, auditor who had conducted an audit of the bridge has been arrested by Police. pic.twitter.com/6bHvVzwN2J
— ANI (@ANI) March 18, 2019
Mumbai CST Bridge Collapse : ’त्या’ सहा जणांच्या मृत्यूस संबंधित अधिकारीच जबाबदार