मुंबईची लेडी डॉन NCB च्या जाळ्यात, २२ वर्षीय इकरा महिलांना सोबत घेऊन करते ड्रग्सचा धंदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 04:05 PM2021-04-08T16:05:33+5:302021-04-08T16:08:53+5:30
Mumbai drug queen Ikra arrested : २२ वर्षीय इकरा डोंगरीतील हाजी कसम चॉलमध्ये आढळून आली. त्यावेळी तिच्याकडून ५२ ग्रॅम मेफेडरोने ड्रग्स ताब्यात घेतलं.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील (Mumbai) ड्रग्स तस्करांवर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच एनसीबीच (NCB) कारवाई सुरूच आहे. आता मुंबईच्या डोंगरीतील २२ वर्षीय लेडी डॉनला(Lady Don) एनसीबीने बुधवारी अटक केली. असे सांगितले जात आहे की, ही लेडी डॉन मुंबईतील डिस्को थेकमध्ये ड्रग्स सप्लाय(Drugs) करत होती.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई एनसीबी टीमने डोंगरीच्या भागात ६ मार्च रोजी छापेमारी करत २२ वर्षीय इकरा अब्दुल गफ्फार कुरेशीला Ikra Abdul Gaffar Qureshi) अटक केली होती. २२ वर्षीय इकरा डोंगरीतील हाजी कसम चाळीमध्ये आढळून आली. त्यावेळी तिच्याकडून ५२ ग्रॅम मेफेडरोने ड्रग्स ताब्यात घेतलं. इकराच्या विरोधात मुंबईच्या नागपाडा भागात २०२० मध्ये मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल आहे. (हे पण वाचा : खोट्या परवानाद्वारे बांधकाम; गृहकर्जाचे हप्ते न भरता फसवणूक)
मुंबई एनसीबी चीफ समीर वानखेडे यांच्यानुसार, इकरा एनसीबीच्या एका केसमध्ये वॉन्टेड होती. काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित ड्रग माफिया चिंकू पठाणला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशी दरम्यान इकराची माहिती मिळाली. तेव्हापासून एनसीबी इकराच्या मागावर होते. (हे पण वाचा : बनावट ठेव पावत्या सादर करुन 'मिलिटरी फार्मस'ची ३८ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक)
समीर वानखेडे यांच्यानुसार, इकरा ड्रग्सच्या धंद्यातील क्वीन आहे. इकराने तिच्या हाताखाली ५ ते ६ महिला ठेवल्या आहेत. त्यांच्या माध्यमातूनच मुंबईतील बार आणि डिस्को थेकमध्ये ती ड्रग्स सप्लाय करत होती. इकरा कुरेशी इतका खतरनाक आहे की, कुणीही तिच्या विरोधात झालं तर ती त्यांच्यावर हल्ले करवते. इकराचा पती आणि तिचा बॉयफ्रेन्ड दोघेही तुरूंगात कैद आहेत.
इकराला पाच वर्षाचा मुलगाही आहे. इकरा इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून ड्रग्स डील करत होती. दिसायला सुंदर इकराचा ड्रग्सचा धंदा मुंबईच्या अनेक भागांमध्ये पसरला आहे. एनसीबी सध्या तिची चौकशी करत आहे. सोबतच इकराला लवकरच कोर्टात हजर केलं जाईल. आणि त्यानंतर रिमांडवर घेतलं जाईल.