पूल पार्टी, म्यूझिकल परफॉर्मेंस...; लक्झरी क्रूझवर 72 तासांत होणार होत्या 'या' सर्व गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 10:03 AM2021-10-03T10:03:59+5:302021-10-03T10:06:25+5:30

गुप्तचरसंस्थेला मिळालेल्या एका इनपुटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एनसीबीने जहाजावरून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थदेखील जप्त केले आहेत.

Mumbai-goa cruise ship drugs rave party, Pool Party, Musical Performance Everything was going to happen in 72 hours on a luxury cruise | पूल पार्टी, म्यूझिकल परफॉर्मेंस...; लक्झरी क्रूझवर 72 तासांत होणार होत्या 'या' सर्व गोष्टी

प्रतिकात्मक फोटो.

googlenewsNext

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी मोठी कारवाई केली. एनसीबीच्या टीमने मुंबईहून गोव्याकडे जात असलेल्या एका जहाजावर छापा टाकला. हे आलिशान क्रूझ जहाज तीन दिवसांच्या प्रवासाला निघाले होते. या जहाजावर बॉलिवूड, फॅशन आणि बिझनेस इंडस्ट्रीशी संबंधित लोक उपस्थित होते. (Mumbai-goa cruise ship drugs rave party; Pool Party, Musical Performance Everything was going to happen in 72 hours on a luxury cruise)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचरसंस्थेला मिळालेल्या एका इनपुटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एनसीबीने जहाजावरून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थदेखील जप्त केले आहेत. एवढेच नाही, तर ज्या लोकांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे, त्यांत एका मोठ्या बॉलिवूड स्टारच्या मुलाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे जहात तीन दिवसांच्या प्रवासावर होते. तसेच या तीन दिवसांत या जहाजावर काय काय होणार होते यासंदर्भात माहितीही समोर आली आहे. एका वृत्त संस्थेने म्हटले आहे, की  हे जहाज शनिवार दुपारी 2 वाजता मुंबईहून रवाना होणार होते आणि 4 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता अरबी समुद्रातून परत येणार होते. मिळालेल्या माहितीनुसार हे जहाज Cordelia या भारतीय कंपनीचे आहे. यात फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या Namascray Experience ने 'Cray Ark' नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजकही एनसीबीच्या रडारवर असून लवकरच त्यांचा जबाबही नोंदवला जाणार आहे. 

नेमकं काय-काय होणार होतं जहाजावर? -
- पहिल्या दिवशी, या क्रूझवर मियामी येथील डीजे स्टेन कोलेव तसेच डीजे बुल्जआय, ब्राउनकोट आणि दीपेश शर्मा यांचे म्यूजिकल परफॉर्मेंस होणार होते.

- दुसऱ्या दिवशी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत फॅशन टीव्हीने पूल पार्टीचे आयोजन केले होते. पूल पार्टीदरम्यान, आयव्हरी कोस्टमधील डीजे राऊलचे भारतीय डीजी कोहरा आणि मोरक्कन कलाकार कायझा परफॉर्म करणार होते. रात्री 8 नंतर, FTV पाहुण्यांसाठी शॅम्पेन ऑल-ब्लॅक पार्टीचे आयोजित करणार होता. HOSH स्पेस मोशन आणि उर्वरित कलाकार रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत इलेक्ट्रॉनिक संगीत कार्यक्रम सादर करणार होते.

- तीसऱ्या दिवशी म्हणजेच 4 ऑक्टोबरच्या सकाळी 10 वाजता जहाज मुंबईला परत येणार होते.
 

Read in English

Web Title: Mumbai-goa cruise ship drugs rave party, Pool Party, Musical Performance Everything was going to happen in 72 hours on a luxury cruise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.