नवाब मलिकांना पुन्हा एकदा दणका! मुंबई हायकोर्टाने वैद्यकीय जामीन अर्ज फेटाळला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 13:18 IST2023-07-13T13:17:18+5:302023-07-13T13:18:59+5:30
नियमित जामीन अर्ज करण्याचा मार्ग अद्यापही खुला

नवाब मलिकांना पुन्हा एकदा दणका! मुंबई हायकोर्टाने वैद्यकीय जामीन अर्ज फेटाळला!
Nawab Malik Bail plea rejected: मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी नवाब मलिक यांना दणका दिला. हायकोर्टाने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला. नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन अर्ज नाकारण्यात आला. त्यामुळे नवाब मलिक यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. याआधी मलिक यांनी कनिष्ठ न्यायालयात या संदर्भातील जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यावेळीही त्यांचा नाकारण्यात आला होता. त्यानंतर आज उच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळला.
अर्ज फेटाळत असताना हायकोर्टाने मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने दिलेला निर्णय योग्य ठरवला. नवाब मलिक यांनी कोर्टाकडून वैद्यकीय उपचारासाठी विशेष जामीन अर्ज केला होता. पण सध्या मलिक त्यांनी निवडलेल्या खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारात तपास यंत्रणांनी कुठेही आडकाठी केलेली नाही. त्यांच्यावरील उपचार व वैद्यकीय शस्त्रक्रियांसाठी त्यांना न्यायालयीन कोठडीत असताना कोणतीही मनाई केलेली नाही. त्यामुळे PMLA च्या आरोपातील आरोपीला जामीन देणं चूक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यावर कोर्टाकडून मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढवण्यावर शिक्कामोर्तब झाले.