मला कोरोना झालाय म्हणत पती घर सोडून गेला; पोलिसांना इंदूरमध्ये गर्लफ्रेंडसोबत सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 04:17 PM2020-09-17T16:17:05+5:302020-09-17T16:40:22+5:30
इकडे पतीसोबत संपर्क होऊ न शकल्याने हैराण झालेली पत्नी मदतीसाठी पोलिसांकडे गेली. तिने पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
नवी मुंबईतून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका पतीने पत्नीला खोटं सांगितलं की, तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याने कोविड सेंटरमध्ये भरती होण्याचं आणि परिवाराला संक्रमणापासून वाचवण्याचं कारण सांगितलं. आणि तो त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत फरार झाला. इकडे पतीसोबत संपर्क होऊ न शकल्याने हैराण झालेली पत्नी मदतीसाठी पोलिसांकडे गेली. तिने पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या महिलेच्या पतीला गर्लफ्रेंडसोबत इंदूरमधून अटक केली.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २४ जुलैला तळोजा येथे राहणाऱ्या २८ वर्षीय व्यक्तीने पत्नीला फोन केला आणि सांगितले की, तो कोरोना पॉझिटिव्ह झालाय. तो म्हणाला की, तो फार त्रासात आहे आणि जीव द्यायला जात आहे. हे ऐकून धक्का बसलेली पत्नी रडतच त्याला रोखू लागली, पण त्याने फोन कट केला.
सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांनी सांगितले की, या व्यक्तीने त्याचा फोन स्विच ऑप केला होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या मेहुण्याला भावोजीची बाइक वाशीच्या एका गल्लीत बेवारस पडलेली दिसली. बाइकवरच त्याचं हेल्मेट, ऑफिस बॅग आणि पाकिट ठेवलं होतं. परिवाराने त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली.
वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर संजीव धुमल म्हणाले की, पोलिसांची टीम या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेली. वाशीच्या आजूबाजूच्या नाल्यांमध्ये त्याचा शोध घेण्यात आला. सर्व कोविड सेंटर्सवर त्याचा शोध घेण्यात आला. नंतर त्याचा फोन सर्व्हिलांसवर लावण्यात आला. बराच शोध घेतल्यावर पोलिसांनी त्याचा शोधलं.
पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीने त्याच्या मोबाइलमधील पहिलं सिम बंद करून नवीन सिम टाकलं. पोलिसांना सर्व्हिलांसच्या माध्यमातून समजलं की, मोबाइल इंदूरमध्ये सुरू आहे. मग पोलिसांची एक टीम इंदूरला पोहोचली आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितले की, तो इंदूरमध्ये आपली ओळख आणि नाव बदलून गर्लफ्रेंडसोबत एका भाड्याच्या घरात राहत होता.
हे पण वाचा :
दारुच्या नशेत तरुणीवर जबरदस्ती, मैत्रिणीच्या मदतीने केला तरुणाचा खून
संतापजनक ! मदतीच्या बहाण्याने मध्यप्रदेशच्या मजूर महिलेवर ठेकेदाराचा अत्याचार
धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग