Terrorist arrested in Mumbai: मुंबईतून दहशतवाद्याला अटक! WANTED गुन्हेगाराशी होता संपर्कात; महाराष्ट्र ATSची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 06:56 PM2022-10-13T18:56:46+5:302022-10-13T18:57:43+5:30
पंजाब पोलिस-इंटेलिजेंस हेड क्वार्टरवर ९ मे रोजी केला होता रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला
Terrorist arrested in Mumbai: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक विविध ठिकाणी धडक कारवाई करताना दिसत आहे. याच दरम्यान आज मुंबईचा एका ३० वर्षीय दहशतवाद्याल पकडण्यात Maharashtra ATS ला यश आले. अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय दहशतवाद्याचे नाव चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग करिसिंग असून तो मूळचा पंजाब येथील आहे. त्याला महाराष्ट्र एटीएसनेमुंबईतून बुधवारी अटक केली. त्याला पुढील आवश्यक कारवाईसाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तो कॅनडामधील वाँटेड दहशतवादी (Wanted Terrorist) लखबीर सिंग लांडा याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले, असल्याची माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दिली.
A Punjab-based 30-year-old terrorist, Charatsingh alias Indrajitsingh Karisingh, arrested in Mumbai by Maharashtra ATS; handed over to Punjab Police for further necessary action. It was revealed that he is in contact with wanted terrorist Lakhbir Singh Landa in Canada: Maha ATS pic.twitter.com/L8bsqjHLyK
— ANI (@ANI) October 13, 2022
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहिती नुसार, चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग करिसिंग उर्फ कारज सिंग, (वय ३०) असे नाव असलेल्या दहशतवाद्याविरुद्ध ८ गुन्हे दाखल आहेत. मार्च २०२२ पासून तो पंजाबच्या कपूरथला तुरुंगातून २ महिन्यांच्या पॅरोल रजेवर बाहेर होता. त्याच्या पॅरोल कालावधीत त्याने त्याच्या साथीदारांसह पंजाब पोलिस, इंटेलिजेंस हेड क्वार्टर, मोहाली येथे ९ मे २०२२ रोजी रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) ने हल्ला केला.
त्याच्या ठावठिकाणाबाबत महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार एटीएसच्या पथकाने त्याला मालाड, मुंबई येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, तो सध्या कॅनडामध्ये असलेल्या लखबीर सिंग लांडा नावाच्या वॉन्टेड दहशतवाद्याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. पुढील कारवाईसाठी अटक केलेल्या आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.