मुंबईत अमलीपदार्थ विक्रेते रडारवर; पार्टी ड्रग्ज जप्त, वरळी, अंधेरीत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 05:06 AM2018-11-18T05:06:15+5:302018-11-18T05:06:26+5:30

वांद्रे कक्षाने अंधेरी परिसरातून २५ ग्रॅम एमडी तस्करी प्रकरणी नायजेरीयन तरुणाला अटक केली आहे. एकूण कारवाईत १५ लाखांहून अधिक किमतीचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत.

Mumbai-operated retailers; Party drugs seized, Worli, dark action | मुंबईत अमलीपदार्थ विक्रेते रडारवर; पार्टी ड्रग्ज जप्त, वरळी, अंधेरीत कारवाई

मुंबईत अमलीपदार्थ विक्रेते रडारवर; पार्टी ड्रग्ज जप्त, वरळी, अंधेरीत कारवाई

Next

मुंबई : अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) धडक मोहीम हाती घेतली आहे. अवघ्या २४ तासांत ४ ठिकाणी छापे मारत एलएसडी पेपर, एमडीएमएसोबत चरस आणि एमडींचे लाखोंचे पार्टी ड्रग्ज जप्त केले
आहेत. वरळी, कुर्ला, अंधेरी आणि मालवणी या भागात ही कारवाई केली आहे.
वरळी परिसरात ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती वरळी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना मिळाली. त्यानुसार, तपास पथकाने गुरुवारी लोअर परळ, मथुरादास मिल संकुल परिसरातून लक्ष्मण पादुकोडे राजन उर्फ निखिल या तरुणाला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून ८१ एलएसडी पेपर आणि ११ ग्रॅम एमडी आढळले. पथकाने ड्रग्ज जप्त केले.
गेल्या वर्षी निखिलला याच पथकाच्या कांदिवली कक्षाने एलएसडी विक्रीप्रकरणी अटक केली होती.
या कारवाईपाठोपाठ कांदिवली कक्षाने मालवणीतून सलीम खान उर्फ सलीम टेम्पो या तस्कराला पाऊण किलो चरससह अटक केली. तर आझाद मैदान कक्षाने कुर्ला येथील कल्पना चित्रपटगृहाजवळून असगरअली शेखला बेड्या
ठोकल्या. त्याच्या जवळून दीड किलो चरस हस्तगत केला आहे.
तर वांद्रे कक्षाने अंधेरी परिसरातून २५ ग्रॅम एमडी तस्करी प्रकरणी नायजेरीयन तरुणाला अटक केली आहे. एकूण कारवाईत १५ लाखांहून अधिक किमतीचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपींकडे अधिक तपास सुरू असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध पथकाकडून सुरू आहे.

Web Title: Mumbai-operated retailers; Party drugs seized, Worli, dark action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.