Baba Siddique : रात्री ४ मित्रांचा इंटरनेट कॉल...; शूटर शिवापर्यंत कसे पोहोचले पोलीस, कसं सापडलं नेमकं लोकेशन?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 04:01 PM2024-11-12T16:01:10+5:302024-11-12T16:01:10+5:30

Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमार उर्फ ​​शिवा गौतमला यूपीमधून अटक केल्यानंतर आता नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत.

mumbai police alerted by internet call of four friends night new revelation on arrest of baba siddiqui shooter | Baba Siddique : रात्री ४ मित्रांचा इंटरनेट कॉल...; शूटर शिवापर्यंत कसे पोहोचले पोलीस, कसं सापडलं नेमकं लोकेशन?

Baba Siddique : रात्री ४ मित्रांचा इंटरनेट कॉल...; शूटर शिवापर्यंत कसे पोहोचले पोलीस, कसं सापडलं नेमकं लोकेशन?

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमार उर्फ ​​शिवा गौतमला यूपीमधून अटक केल्यानंतर आता नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. पोलिसांच्या चौकशीत शिवकुमारने गुन्ह्याची कबुली तर दिलीच, पण हे संपूर्ण हत्याकांड त्याने कसं आणि कोणाच्या सांगण्यावरून घडवून आणलं, याचीही माहिती दिली. आता शूटर शिवापर्यंत ते कसे पोहोचले आणि नेमकं ठिकाण कसं सापडलं हे मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

मुंबई क्राइम ब्रँच आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) बहराइचच्या नानपारा भागात छापा टाकला आणि बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील वॉन्टेड शूटर शिवा गौतमला अटक केली. शिवा नेपाळला पळून जाण्याचा प्लॅन करत होता. पोलिसांनी शिवाचे सहकारी अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंह यांनाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवा आणि त्याचे साथीदार नेपाळ सीमेजवळ लपून बसले होते.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात शिवा गौतमच्या चार मित्रांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या आणि पोलिसांना संशय आला. त्यानंतर तपास पुढे सरकल्यावर पुरावे मिळाले. शिवाचे चार सहकारी प्रथम बहराइचमध्ये कपडे खरेदी करताना आणि नंतर नानपारा येथून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलाच्या दिशेने बाईकवरून जाताना दिसले. नंतर पोलिसांना कळलं की, हे चार आरोपी शूटर शिवाला मदत करत होते.

शिवाने १२ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईतील वांद्रे भागात सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. घटनेनंतर तो प्रथम कुर्ल्याला गेला. त्यानंतर ते ठाण्याला जाण्यासाठी लोकल ट्रेनमध्ये चढले. प्रवासादरम्यान त्याने त्यांची बॅग आणि मोबाईल तेथेच फेकून दिला होता. १३ ऑक्टोबरला पहाटे साडेतीन वाजता शिव पुण्यात पोहोचला. त्यानंतर ते लखनौसाठी ट्रेनमध्ये चढला. वाटेत त्याने प्रवाशांचे मोबाईल वापरले आणि सहकाऱ्यांना अनेक फोन केले.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हे चार मित्र रात्री उशिरा इंटरनेटवर एकमेकांशी बोलत असत. काही दिवसांपूर्वी या सर्वांनी नानपारा येथील एका कपड्याच्या दुकानातून वेगवेगळ्या आकाराचे शर्ट आणि ट्राउझर्स खरेदी केले होते. रविवारी चारही मित्र दोन शिवाला भेटायला गेले होते. पोलिसांच्या पथकांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने चार मित्रांना नानपारा येथील एका पुलावर थांबवून ताब्यात घेतलं. चौघांचीही कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांना शिवाच्या अड्ड्याकडे नेल्याचं पोलिसांनी सांगितलं. नंतर शिवालाही एका गावातून अटक करण्यात आली.
 

Web Title: mumbai police alerted by internet call of four friends night new revelation on arrest of baba siddiqui shooter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.