फेक TRP प्रकरणात मोठी कारवाई, 'BARC'च्या माजी अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक
By पूनम अपराज | Published: December 17, 2020 10:04 PM2020-12-17T22:04:58+5:302020-12-17T22:05:33+5:30
Fake TRP Scam : या प्रकरणात आता अटकेतील आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे.
मुंबई - TRP घोटाळ्यात मुंबईपोलिसांकडूनअटकसत्र सुरू आहे. बार्कच्या (BARC) माजी अधिकाऱ्याला आज विशेष पथकाने अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अटकेतील आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे.
टीआरपी घोटाळा प्रकरणात रविवारपासून अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना एस्प्लानेड मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने काल सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर आज या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (BARC) माजी मुख्य ऑपरेशन ऑफिसर (सीओओ) रोमिल रामगढिया (Romil Ramgarhia ) यांना अटक केली. बार्क संस्थेशी संबंधित ही पहिलीच अटक असून आतापर्यंत या प्रकरणात १४ जणांना अटक केली आहे.