लग्न झाल्यानंतर लगेच 'रडला' नवरदेव, नवरीऐवजी पोलिसांसोबत घालवावी लागली रात्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 02:02 PM2021-03-18T14:02:40+5:302021-03-18T14:03:35+5:30

लग्न करून तो नवरीला घरी घेऊन येत होता. याच रात्री त्याचा मधुचंद्रही होणार होता. मात्र, नवरीऐवजी त्याला लग्नानंतरची पहिली रात्र मुंबई पोलिसांसोबत काढावी लागली.

Mumbai police arrested Noida man rom Muzaffarnagar just after wedding | लग्न झाल्यानंतर लगेच 'रडला' नवरदेव, नवरीऐवजी पोलिसांसोबत घालवावी लागली रात्र!

लग्न झाल्यानंतर लगेच 'रडला' नवरदेव, नवरीऐवजी पोलिसांसोबत घालवावी लागली रात्र!

Next

मुजफ्फरनगरमध्ये लग्न करून नवरीसोबत आपल्या घरी परतलेल्या नवरदेवाला पोलिसांनी अटक केली. ऑनलाइन फसवणुकीचा आरोपी नवरदेव मुळचा यूपीती अरिया जिल्ह्यातील राहणारा आहे. तो सध्या नोएडामध्ये राहतो. मुजफ्फरनगरच्या बुढाना येथे लग्न करून तो नवरीला घरी घेऊन येत होता. याच रात्री त्याचा मधुचंद्रही होणार होता. मात्र, नवरीऐवजी त्याला लग्नानंतरची पहिली रात्र मुंबई पोलिसांसोबत काढावी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस ज्या नवरदेवाला पकडून घेऊन गेले त्याचं नाव आलोक शुक्ला(२८) आहे. तो आपल्या परिवारासोबत काही दिवसांपासून नोएडामध्ये राहतो. त्याने ऑनलाइन रजिस्ट्रेशनचं ऑफिस उघडलं होतं. आलोक शुक्लाचं लग्न मुजफ्फरनगरच्या सठेडी गावात ठरलं होतं.  तो वरात घेऊन सठेडी आला होता. लग्नाचे सर्व रितीरिवाज पार पडले. (हे पण वाचा : बोंबला! शिक्षिकेने आपल्या १३ वर्षीय विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती केलं 'लग्न', घरात ६ दिवस ठेवलं डांबून!)

दुसऱ्या दिवशी पाठवणी सुरू होती. नवरी आपल्या परिवारासोबत गळाभेट घेत रडत होती. जसा नवरदेव तिला कारमध्ये बसवून पुढे सरकला सठेडी गावाबाहेरच पोलिसांनी वरात आणि नवरदेवाला थांबवलं. पोलिसांना आलोक शुक्लाला अटक केली.

मुंबई पोलीसच्या सायबर सेलच्या महिला इन्स्पेक्टर शुभांगी सिंह यांनी नवरीला सांगितले की, आलोक शुक्ला विरोधात मुंबईमध्ये अनेक लोकांना ऑनलाइन फसवणूक करत पैसे लाटल्याची तक्रार दाखल केली आहे. त्याचा गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही शोध घेत होतो. अचानक पोलिसांना आलोकच्या लग्नाची माहिती मिळाली आणि ते मुजफ्फरपूरमध्ये पोहोचले. तेव्हा पोलिसांनी नवरदेवाला अटक केली. नवरदेवाला पोलीस घेऊन गेल्यावर घरातील लोक नवरीला नोएडाला घेऊन गेले.

ऑनलाइन फसवणूक

पोलिसांनी सांगितले की, आलोक परदेशात राहत होता. भारतात परतल्यावर त्याने नोएडामध्ये ऑनलाइन पासपोर्ट प्रोवायडिंग सर्व्हिस सुरू केली. यादरम्यान मुंबईत त्याच्या विरोधात फ्रॉडची केस दाखल झाली. काही दिवसांपूर्वी मुंबईची एक टीम नोएडाला आली. पण आरोपी काही सापडला नाही. पोलिसांनी आलोकचा नंबर घेतला आणि तेथून गेले.
 

Web Title: Mumbai police arrested Noida man rom Muzaffarnagar just after wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.