काळजाचा ठोका चुकवणाऱ्या स्टंटबाजास मुंबई पोलिसांनी केली अटक 

By पूनम अपराज | Published: October 16, 2020 02:58 PM2020-10-16T14:58:58+5:302020-10-16T15:00:49+5:30

Mumbai Dangerous Stunts Video : दोन्ही हातांवर संपूर्ण शरीराचा तोल टाकून वर पाय करून हा स्टंट केला होता. अगदी थोड्या असमतोलामुळे त्याला जीव गमवावा लागला असता.

Mumbai police arrested stuntman, who made stunt video in kandivali | काळजाचा ठोका चुकवणाऱ्या स्टंटबाजास मुंबई पोलिसांनी केली अटक 

काळजाचा ठोका चुकवणाऱ्या स्टंटबाजास मुंबई पोलिसांनी केली अटक 

Next
ठळक मुद्देपोलिसांनी या तिघांविरूद्ध कलम 336 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे.

मुंबई - मुंबईपोलिसांनी शुक्रवारी कांदिवली येथील एका इमारतीच्या 23 व्या मजल्यावरील काठावर धोकादायक 'स्टंट' करणाऱ्या एका तरूणाला आज अटक केली. त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, तो परदेशी स्टंट कलाकारांद्वारे प्रेरित झाला होता. या आठवड्याच्या सुरूवातीस व्हायरल झालेल्या 'स्टंट'च्या व्हिडिओमध्ये हा तरुण मुंबईच्या कांदिवलीतील एका उंच इमारतीच्या 23 व्या मजल्यावरील काठावर काळजाचा ठोका चुकवणार स्टंट करताना दिसला. दोन्ही हातांवर संपूर्ण शरीराचा तोल टाकून वर पाय करून हा स्टंट केला होता. अगदी थोड्या असमतोलामुळे त्याला जीव गमवावा लागला असता.

तो तरुण 'स्टंट' करताना दिसत आहे, तर त्याचे दोन साथीदार व्हिडिओ शूट करताना दिसतात, जो स्टंटचा व्हिडीओ नंतर इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. पोलिसांनी या तिघांविरूद्ध कलम 336 आणि 34 अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे.
 

उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावर जीवघेणा स्टंट; थरकाप उडवणारा Video तुफान व्हायरल

 

काय आहे हा स्टंट ?

सोशल मीडियावर सध्या विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच थरकाप उडवणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. उंच इमारतीच्या कठड्यावर जीवघेणा स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. मुंबईतील कांदिवली पश्चिम भागातील लालजी पद येथील जय भारत कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या २३ व्या मजल्यावर हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेतली असून काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट करणाऱ्या तरुणाचा अटक केली आहे. 

Web Title: Mumbai police arrested stuntman, who made stunt video in kandivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.