मुंबई पोलीस आयुक्त बर्वे यांना पुन्हा मिळू शकते मुदतवाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 06:50 PM2019-11-13T18:50:47+5:302019-11-13T18:52:32+5:30

बर्वे यांना कार्यकाळ ३० ऑगस्ट रोजी संपला होता.

Mumbai Police Commissioner Barve may get again extended | मुंबई पोलीस आयुक्त बर्वे यांना पुन्हा मिळू शकते मुदतवाढ 

मुंबई पोलीस आयुक्त बर्वे यांना पुन्हा मिळू शकते मुदतवाढ 

Next
ठळक मुद्देआता पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू असल्याने मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.   आता ३० नोव्हेंबरला बर्वे यांचा वाढीव कार्यकाळ संपत आहे. ३१ नोव्हेंबरपर्यंत राज्यात सत्ता स्थापन झाली तर मात्र मुंबईत नवे पोलीस आयुक्त रुजू होई शकतात.

मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तसंजय बर्वे यांना पुन्हा ३ महिन्यांची मुदतवाढ मिळू शकते. कारण महाराष्ट्रात सध्यातरी तरी राष्ट्रपती राजवट लागू झालेली असून या काळात राष्टपतींच्या देखरेखीखाली राज्याचा कारोभार सांभाळला जाईल. त्याचप्रमाणे या काळात कोणतीही बदली किंवा नवीन नेमणूक केली जात नसल्याने मुंबई पोलीस आयुक्तसंजय बर्वे यांना मुंबीएच्या सुरक्षेची धुरा सांभाळण्यासाठी आणखी ३ महिने मुदत वाढ मिळू शकते. मात्र, ३१ नोव्हेंबरपर्यंत राज्यात सत्ता स्थापन झाली तर मात्र मुंबईत नवे पोलीस आयुक्त रुजू होई शकतात. बर्वे यांना कार्यकाळ ३० ऑगस्ट रोजी संपला होता. मात्र, त्यांना ३ महिने मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता ३० नोव्हेंबरला बर्वे यांचा वाढीव कार्यकाळ संपत आहे. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने बर्वे यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.  

ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुका, अयोध्या निकाल, भारताने काश्मीरमधील कलम ३७० हटविले या पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना ऑगस्टमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तपदी कार्यरत असलेले संजय बर्वे हे ३१ ऑगस्ट रोजी सेवा निवृत्त होणार होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ वाढविल्याने नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. 

अत्यंत कडक शिस्तीचे, मृदू स्वभावाचे आणि स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून मुंबई पोलीस आयुक्त म्हणून संजय बर्वे यांची ओळख आहे. माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांची पोलीस महासंचालकपदी निवड झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी बर्वे यांची निवड करण्यात आली. मात्र, सहा महिन्यांनी बर्वे हे सेवा निवृत्त होणार होते. अत्यंत कमी काळात बर्वे यांनी आयुक्त पदाची धूरा अत्यंत चांगल्यारित्या संभाळली. ३१ ऑगस्ट रोजी बर्वे हे निवृत्त होणार असल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त पदी वर्णी लागण्यासाठी अनेक दिग्गज आयपीएस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक पद्धतीने मोर्चे बांधणी सुरू केली होती. मात्र, बर्वे यांना ३० ऑगस्टला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना संजय बर्वे यांच्या खांद्यावर पुन्हा ३ महिने मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Mumbai Police Commissioner Barve may get again extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.