मुंबईतील पोलिसाने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला अखेरचा मेसेज, "तू त्यांना सोडू नकोस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:12 IST2025-03-07T12:12:00+5:302025-03-07T12:12:46+5:30

बालपणीच अनाथ झालेल्या सुभाष यांचा सांभाळ त्यांच्या मामांनी केला होता.

Mumbai Police Employee Subhash Kangane, of Kurar Police Station committed suicide, wrote a 2-page note and sent it to his wife | मुंबईतील पोलिसाने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला अखेरचा मेसेज, "तू त्यांना सोडू नकोस..."

मुंबईतील पोलिसाने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला अखेरचा मेसेज, "तू त्यांना सोडू नकोस..."

मुंबई - नाशिक इथल्या विवेकानंदनगर भागात राहणाऱ्या सुरेश सानप यांचे जावई आणि मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सुभाष कांगणे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गोरेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आत्महत्या करण्यापूर्वी सुभाष कांगणे यांनी २ पानी चिठ्ठी लिहून मनमाड येथे असलेल्या पत्नीला व्हॉट्सअप केल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. सुभाष त्यांच्या कुटुंबियांनी आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. अखेरीस पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आश्वासन दिले, दिंडोशी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष यांच्या पश्चात पत्नी जयश्री, अडीच वर्षाच्या २ मुली, एक भाऊ आणि एक बहीण आहे. 

बालपणीच अनाथ झालेल्या सुभाष यांचा सांभाळ त्यांच्या मामांनी केला होता. सुभाष कांगणे हे मूळचे येवला तालुक्यातील मुखेडचे रहिवासी होते. त्यांचा मृतदेह मनमाड येथे त्यांच्या सासुरवाडीत आणण्यात आला तेव्हा कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त केला. मनमाड येथे सुभाष कांगणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत काय लिहिलंय?

आत्महत्येपूर्वी सुभाष यांनी पत्नीला चिठ्ठी पाठवली. या चिठ्ठीत त्यांनी माझ्या नावाने सहायक पोलीस उपनिरीक्षक सुर्वे यांनी अर्ज करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे मला समजले आहे. माझ्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना तू सोडू नको. आपल्या दोन्हीही बाळांची व लहान भावाची काळजी घे असं लिहून सुभाष कांगणे यांनी पत्नी जयश्रीची माफी मागितली आहे.

Web Title: Mumbai Police Employee Subhash Kangane, of Kurar Police Station committed suicide, wrote a 2-page note and sent it to his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.