मुंबई पोलीस दलात ३८ उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 07:23 PM2019-01-15T19:23:38+5:302019-01-15T20:07:52+5:30
११६ व्या तुकडीतील अधिकारी; एक वर्षाचा पर्यवेक्षण कालावधी
मुंबई - मुंबई पोलीस दलात नव्याने रुजू झालेल्या ३८ पोलीस उपनिरीक्षकांना विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आले आहे. एक वर्षासाठी त्यांना त्याठिकाणी पर्यवेक्षणार्थी अधिकारी म्हणून काम करावे लागणार आहे.त्यानंतर त्यांना कायम केले जाईल.
शहर व उपनगरातील विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आलेल्यामध्ये सुलतान मुजावर (वांदे्र),सचिन आव्हाड ( व्हीपी रोड) बालाजी कदम (मालाड), विशाल कोरडे (पवई), बाळासाहेब पोटे (अंबोली ), उमेश राजपुरे (कुर्ला),दिनेश पाटील (एम.आर.ए. मार्ग) आदीचा समावेश आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने पोलीस खात्यातर्गंत घेण्यात आलेल्या उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत गुणवत्तेवर उर्त्तीण झालेल्या १५२ उमेदवारांना ९ महिन्यापूर्वी नाशिक येथील पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षणाला पाठविण्यात आले होते. त्यांचा दीक्षांत समारंभ गेल्या आठवड्यात महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या उपस्थित झाला. उपनिरीक्षकाच्या ११६ व्या तुकडीतील १५२ पैकी ३८ जणांना मुंबई आयुक्तालय देण्यात आले आहे. मुख्यालयात हजर झाल्यानंतर शनिवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले.