मुंबई पोलिसांनी थेट परमबीर सिंग यांच्या दारावरच चिटकवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 10:04 PM2021-10-09T22:04:06+5:302021-10-09T22:04:32+5:30

Mumbai police crime branch issues notice to Param Bir Singh : परमबीर हे ७ एप्रिलला तपास यंत्रणांसमोर हजर झाले होते. मुंबईत २५ फेब्रुवारीला झालेल्या अँटेलिया बॉम्ब प्रकरणात त्यांना समन्स जारी करण्यात आले होते.

Mumbai Police posted a notice directly on Parambir Singh's home's door | मुंबई पोलिसांनी थेट परमबीर सिंग यांच्या दारावरच चिटकवली नोटीस

मुंबई पोलिसांनी थेट परमबीर सिंग यांच्या दारावरच चिटकवली नोटीस

Next
ठळक मुद्देवाळकेश्वर परिसरातील नीलिमा इमारतीतील सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर या नोटीसची प्रत चिटकवण्यात आली आहे. 

मुंबई : माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Param Bir Singh) हे रशियात पळाल्याची चर्चा सुरु आहे. सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यात राज्य सरकारनेही सिंग याच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. भ्रष्टाचारप्रकरणी आज थेट त्यांच्या घराच्या दारावरच मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने नोटीस चिकटवली आहे. वाळकेश्वर परिसरातील नीलिमा इमारतीतील सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर या नोटीसची प्रत चिटकवण्यात आली आहे. 

परमबीर सिंग यांच्या खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज मुंबईतील परमबीर यांच्या घरावर नोटीस चिकटवली. खंडणी प्रकरणात १२ ऑक्टोबरपर्यंत चौकशीसाठी हजर राहावे, असे त्यात म्हटले आहे. आता परमबीर दोन दिवसांत गुन्हे शाखेसमोर उपस्थित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते चौकशीला हजर न राहिल्यास त्यांच्या कायदेशीर अडचणीत वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

परमबीर यांनी प्रकृतीच्या तक्रारीचे कारण देऊन होमगार्ड विभागात कार्यरत असताना रजा घेतली होती. मे ते ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र सरकारने त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी आधीची रजा वाढवून घेतली. माझी शस्त्रक्रिया झाली असून, मला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचे त्यांनी सांगितले होते. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही परमबीर यांनी प्रकृती अद्याप ठीक झाली नसल्याचे सांगत रजा आणखी वाढवून घेतली. परमबीर यांना २९ ऑगस्टला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले, मात्र तेव्हापासून त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

परमबीर हे ७ एप्रिलला तपास यंत्रणांसमोर हजर झाले होते. मुंबईत २५ फेब्रुवारीला झालेल्या अँटेलिया बॉम्ब प्रकरणात त्यांना समन्स जारी करण्यात आले होते. नंतर १७ मार्चला परमबीर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करून होम गार्ड विभागात बदली करण्यात आली. त्यांनी या पदाचा पदभार २२ मार्चला स्वीकारला. त्यानंतर ४ मेपर्यंत ते कार्यालयात हजर राहिले. दरम्यान सचिन वाझे आणि परमबीर यांच्या लेटरबॉम्बनंतर ५ मेपासून ते सुट्टीवर गेले. नंतर ते नेपाळमार्गे परदेशात पळाले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. चर्चेनंतर चांदीवाल आयोगाने याबाबत आश्चर्य व्यक्त केले. एक उच्चपदस्थ अधिकारी गायब कसा होऊ शकतो? असा सवालही आयोगाने बुधवारी उपस्थित केला. परमबीर मलबार हिल येथील सरकारी निवासात राहत असल्याचे अधोरेखित करत चांदीवाल आयोगाने त्यांच्या अनुपलब्धतेबाबत शंका व्यक्त केली.

Web Title: Mumbai Police posted a notice directly on Parambir Singh's home's door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.