Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:35 PM2024-11-06T13:35:06+5:302024-11-06T13:36:04+5:30

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार करून त्याचे वडील सलीम खान यांना धमकावल्याप्रकरणी आता एक नवा ट्विस्ट आला आहे.

mumbai police reveals new clues threat letter Salman Khan father salim khan case | Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य

Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करून त्याचे वडील सलीम खान यांना धमकावल्याप्रकरणी आता एक नवा ट्विस्ट आला आहे. २०२२ मध्ये सलीम खान यांना मिळालेलं धमकीचं पत्र त्याच व्यक्तीने लिहिलं असावं, ज्याने सलमान खानच्या घरावर गोळीबार केला होता, असा पोलिसांना संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आतापर्यंत आरोपी विक्की गुप्ता, सागर पाल, मोहम्मद चौधरी आणि हरपाल हरदीप सिंह यांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांच्या गुन्हे शाखेने आता या आरोपींकडून त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने गोळा करण्याची परवानगी मागितली आहे जेणेकरून या नमुन्यांसोबत त्या धमकीच्या पत्राचे हस्ताक्षर जुळवून आरोपीची ओळख पटवता येईल. हे नमुने या प्रकरणात महत्त्वाचे सिद्ध होऊ शकतात. सलीम खान यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास मदत होऊ शकत असल्याने हा तपास अत्यंत महत्त्वाचा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

२०२२ मध्ये मिळाली होती धमकी 

२०२२ मध्ये, ५ जून रोजी, सलमानच्या वडिलांना एका बेंचवर धमकीचं पत्र सापडलं, ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खान यांना सिद्दू मूसेवालाप्रमाणे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रानंतर पोलिसांनी तत्काळ एफआयआर नोंदवला, मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणाशी संबंधित कोणतीही ठोस माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. 

धमकी मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याच्या संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसांना यश आलं नसले तरी आता न्यायालयाने आरोपींकडून हस्ताक्षराचे नमुने गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पोलिसांना आता या प्रकरणात मोठं यश मिळू शकेल, अशी आशा आहे.

Web Title: mumbai police reveals new clues threat letter Salman Khan father salim khan case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.