मुंबई पोलिसांनी त्वरित अनुरागला अटक करायला पाहिजे होते, रामदास आठवलेंचा पायलला पाठिंबा
By पूनम अपराज | Published: September 21, 2020 07:10 PM2020-09-21T19:10:22+5:302020-09-21T19:12:33+5:30
पायलच्या आरोपांची दखल घेऊन मुंबई पोलिसांनी त्वरित अनुरागला अटक करायला पाहिजे होते. याप्रकरणी सीबीआय चौकशी होऊन पायल घोषला न्याय मिळवून दिला पाहिजे. रिपाइंचा पायल घोषला पाठिंबा राहिल, अशा आशयाचे ट्वीट केले आहे.
अभिनेत्री पायल घोष हिने लावलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे दिग्दर्शक व निर्माता अनुराग कश्यप चर्चेत आहे. पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. माझ्या सुरक्षेस धोका असल्याचे पायलने म्हटले आहे. याप्रकरणी आता केंद्रीयमंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी उडी घेत अभिनेत्री पायल घोष यांनी सिनेनिर्माता अनुराग कश्यप यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. पायलच्या आरोपांची दखल घेऊन मुंबईपोलिसांनी त्वरित अनुरागला अटक करायला पाहिजे होते. याप्रकरणी सीबीआय चौकशी होऊन पायल घोषला न्याय मिळवून दिला पाहिजे. रिपाइंचा पायल घोषला पाठिंबा राहिल, अशा आशयाचे ट्वीट केले आहे.
अभिनेत्री पायल घोष यांनी सिनेनिर्माता अनुराग कश्यप यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. पायलच्या आरोपांची दखल घेऊन मुंबईपोलिसांनी त्वरित अनुरागला अटक करायला पाहिजे होते. याप्रकरणी सीबीआय चौकशी होऊन पायल घोषला न्याय मिळवून दिला पाहिजे.रिपाइंचा पायल घोषला पाठिंबा राहिल.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 21, 2020
कालच अनुरागने स्वत:वरचे हे सगळे आरोप नाकारले होते. आज त्याच्या वकीलाने एक स्टेटमेंट जारी करत, अनुरागवरचे लैंगिक गैरवर्तनाचे आरोप खोटे असल्याचा दावा केला. त्यातच अभिनेत्री पायल घोषचे वकील नितीन सातपुते हे अनुराग कश्यपविरोधात आज सायंकाळी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू शकतात. चित्रपट निर्माते कश्यप यांनी एकदा तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्री घोष यांनी केला आहे. कश्यप तिच्यासमोर नग्न असल्याचा दावा घोषने केला असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे. लोकमतशी बोलताना वकील नितीन सातपुते यांनी आज रात्री ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले.
संसदेत पायल घोष यांचे प्रकरण
काल रात्री एक वाजेपर्यंत लोकसभेची कार्यवाही सुरू होती. या दरम्यान गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी संसदेत अनुराग कश्यप यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अनुराग कश्यप यांचे नाव न घेता दरिंदा म्हणून संबोधित केले. ते म्हणाले की, देशातील आमच्या मुली दुर्गा देवीसारखे पूज्य आहेत, पण बॉलिवूडमध्ये असे काही लोक आहेत जे आपले नशिब उजळून टाकण्याचा दावा करतात आणि त्यांच्याशी सौदेबाजी करतात. भाजप खासदाराने या विषयावर कडक कायदा करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कायद्याची भीती निर्माण होईल. २ दिवसांपूर्वी अनुराग कश्यप यांनी खासदार रवी किशन यांच्यावर गांजा पिण्याचा आरोप केला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा
करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार
गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल
महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार
मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू
अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल
एटीएम फोडण्याचा डाव् उधळला, चार अल्पवयीन मुले ताब्यात
सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक