अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी पाठवले समन्स, सामोरं जावं लागणार चौकशीला
By पूनम अपराज | Published: September 30, 2020 02:30 PM2020-09-30T14:30:45+5:302020-09-30T14:31:17+5:30
पायल सतत त्याच्या अटकेची मागणी करत आहे, आता मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
लैंगिक शोषणाच्या आरोपाचा सामना करत असलेल्या बॉलिवूडमधील दिग्दर्शक अनुराग कश्यपला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. अभिनेत्री पायल घोषनेअनुराग कश्यपविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात लैंगिक शोषणाबद्दल गुन्हा दाखल केला होता. पायल सतत त्याच्या अटकेची मागणी करत आहे, आता मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले पायल घोषच्या लढाईत आवाज उठवत आहेत. आठवले यांनी मुंबई पोलिसांना अनुराग कश्यप यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, जर मुंबई पोलिसांनी लवकरच अनुराग कश्यपला अटक केली नाही तर ते धरणे आंदोलनाला बसतील. दरम्यान, आता पोलिस अनुराग कश्यप यांना समन्स पाठवून चौकशी करणार असल्याची बातमी आता समोर आली आहे. पायल घोष अनेक दिवसांपासून न्यायाची मागणी करत होती. पायल घोष हिने इशारा दिला होता की, जर तिला न्याय मिळाला नाही तर ती उपोषणाला बसणार आहे. दिग्दर्शकाला अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला. तसेच काल पायल आपल्या वकिलांसोबत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना भेटली असून तिने न्यायासाठी राज्यपालांची भेट घेतली होती.
मुंबई - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अभिनेत्री पायल घोषसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेऊन निवेदन दिले, दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैगिंक शोषणाचा आरोप @RamdasAthawale@BSKoshyaripic.twitter.com/qktkf63ppx
— Lokmat (@MiLOKMAT) September 29, 2020
पायलचे आरोप अनुराग कश्यप यांनी फेटाळले. त्याने ट्विट करुन आपला मुद्दा मांडला. त्याने लिहिले की, , मला शांत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी इतका वेळ घ्यावा लागला. चला, काही नाही. मला गप्प बसवताना एक महिला असूनही तिने देखील एका महिलेचा आधार घेतला. थोडीतरी मर्यादा पाळा मॅडम, फक्त असे म्हणेन की तुमचे सर्व आरोप निराधार आहेत, अशी माहिती अमर उजालाने दिली आहे.
मुंबई - अभिनेत्री पायल घोष लैंगिक शोषणप्रकरणी न्याय मागण्यासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी दाखल pic.twitter.com/MVWwAMXOEQ
— Lokmat (@MiLOKMAT) September 29, 2020