अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 09:44 AM2020-06-09T09:44:22+5:302020-06-09T09:46:24+5:30
पालघर हत्याकांडासंदर्भातील चर्चेच्या कार्यक्रमात गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याची तक्रार काँग्रेसच्यावतीने देशभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आली होती.
मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीकेवरून खासगी वृत्तवाहिनीचे संपादक अर्नब गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे दीड महिन्य़ापूर्वी मुंबई पोलिसांनी गोस्वामींची १२ तास चौकशी केली होती. आता पुन्हा चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे.
पालघर हत्याकांडासंदर्भातील चर्चेच्या कार्यक्रमात गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याची तक्रार काँग्रेसच्यावतीने देशभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आली. याप्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हा गुन्हा पुढील तपासासाठी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार गोस्वामी यांनी चौकशीसाठी हजर राहावे म्हणून पोलिसांकडून रविवारी दोन नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. आता सोमवारी आणखी एक नोटीस काढण्यात आली असून बुधवारी मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात चौकशी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
या नोटिशीनुसार बुधवारी सकाळी ११ वाजता पायधुनी पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुरेश गायकवाड यांच्यासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्नब गोस्वामींविरोधात विविध कलमांखाली २ मे रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानुसार त्यांची चौकशी केली जाणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
दक्षिण कोरियाच्या विश्वासघातामुळे तणाव; किम जोंग उनने घेतला मोठा निर्णय
बिहारनंतर बंगाल; अमित शहांच्या व्हर्च्युअल रॅलीने ममता बॅनर्जी तणावात
आजचे राशीभविष्य - 9 जून 2020; कन्या राशीच्या लोकांना प्रिय व्यक्ती भेटेल