केतकी चितळेचा मुंबई पोलीस घेणार ताबा; भावेचा शोध सुरु, पुन्हा पोलीस कोठडीची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 09:39 AM2022-05-18T09:39:48+5:302022-05-18T09:41:24+5:30

अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असून, आता तिचा ताबा मुंबईतील गोरेगाव पोलीस घेणार आहेत.

mumbai police to take possession of ketaki chitale less chances to be in police custody again | केतकी चितळेचा मुंबई पोलीस घेणार ताबा; भावेचा शोध सुरु, पुन्हा पोलीस कोठडीची शक्यता कमी

केतकी चितळेचा मुंबई पोलीस घेणार ताबा; भावेचा शोध सुरु, पुन्हा पोलीस कोठडीची शक्यता कमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपत असून आता तिचा ताबा मुंबईतील गोरेगाव पोलीस घेणार आहेत. तिला आता पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की, न्यायालयीन कोठडी हे बुधवारी ठाणे न्यायालयात ठरणार आहे.

ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरुद्ध कलम ५००, ५०१ आणि १५३ अन्वये (बदनामी करणे, तेढ निर्माण करणे) या कलमांखाली गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने तिला १४ मे रोजी अटक केली. तिने फेसबुकवर केलेली पोस्ट ही कोणाच्या सांगण्यावरून केली की, स्वत:च्या मनाने याची अजूनही चौकशी सुरू आहे. हीच चौकशी पूर्ण न झाल्याने ठाणे पोलीस बुधवारी तिच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी ठाणे न्यायालयाला करण्याची शक्यता आहे. तिच्याकडून हस्तगत करण्यासारखे काहीच नसल्याने पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे वकिलांचे मत आहे.

केतकीचे वकीलपत्र घेण्याची तयारी 

केतकीने जामिनासाठी ठाणे न्यायालयात कोणत्याही वकिलाची नियुक्ती केली नसली तरी ठाण्यातील देशपांडे नावाचे एक वकील तिचे वकीलपत्र घेण्याकरिता पुढे आले आहेत. तिच्याकडून मंगळवारी वकील नियुक्त करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. त्यामुळे बुधवारी केतकी स्वत: न्यायालयात बाजू मांडण्याची शक्यता आहे.

पोलीस उपायुक्तांनी केली चौकशी

केतकीने ज्या निखिल भावेची पोस्ट कॉपी केल्याचा दावा केला, त्याबाबतही तिच्याकडे चौकशी झाली. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी मंगळवारी केतकीची चौकशी केली. मात्र,भावेला आपण ओळखत नसल्याचा दावा चौकशीदरम्यान तिने पोलिसांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: mumbai police to take possession of ketaki chitale less chances to be in police custody again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.