खाकी वर्दीने जपली माणुसकी! बेवारस वृद्धाला पायधुनी पोलिसांनी दिली मायेची ऊब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 02:42 PM2019-11-27T14:42:01+5:302019-11-27T14:42:36+5:30

निर्वस्त्राला मिळवून दिला आसरा : वृद्धाला अश्रू अनावर

Mumbai policeman gives warmth to the helpless and homeless old man | खाकी वर्दीने जपली माणुसकी! बेवारस वृद्धाला पायधुनी पोलिसांनी दिली मायेची ऊब

खाकी वर्दीने जपली माणुसकी! बेवारस वृद्धाला पायधुनी पोलिसांनी दिली मायेची ऊब

googlenewsNext

मुंबईपोलिसांकडून पदाच्या गैरवापराबाबतचे अनेक किस्से चर्चेत येत असताना, पायधुनी पोलिसांनी एका वृद्ध बेवारसाला मायेची ऊब मिळवून देणारी घटना सोमवारी घडली. फुटपाथवर निर्वस्त्र आणि गलिच्छ अवस्थेत पडलेल्या आजारी इसमाला त्यांनी औषधोपचार करीत त्याला वृद्धाश्रमात कायमचा आसरा मिळवून दिला. उपनिरीक्षक सुनील रणदिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या औदार्यामुळे वृद्धाला आपले अश्रू रोखता आले नाहीत. अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेला परिमंडळ-२चे उपायुक्त राजीव जैन यांनी अभिनंदन करीत कौतुकाची थाप दिली.

पायधुनीतील मांडवी येथील हाजी हबीब बिल्डिंगसमोरील फुटपाथवर विर्वस्त्रावस्थेत एक वृद्ध पडला आहे. गलिच्छ असल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याची माहिती नागरिकांनी कंट्रोलरूमला दिली. तेथून हा संदेश दक्षिण प्रादेशिक नियंत्रण कक्षातून पायधुनी पोलिसांना दुपारी १२.१९ वाजता कळविण्यात आला. त्यानंतर, पायधुनी मोबाइल-१ बीटवर असलेले उपनिरीक्षक सुनील रणदिवे, सहायक फौजदार कदम, हवालदार वाघमारे, भीमगुडे, साळुंखे, चालक खानविलकर, व्हनखांडे यांच्यासह अवघ्या चार मिनिटांत तेथे पोहोचले.

वृद्धाला हाताने उचलित बाजूला घेत आंघोळ घातली. त्याला चांगले कपडे घालण्यास दिले. २, ३ दिवसांपासून उपाशी असल्याचे समजल्यानंतर उपनिरीक्षक रणदिवे यांनी त्यांना जेवण देत, व्हीलचेअर मध्ये बसवित रुग्णालयात नेऊन तपासणी केली. वृद्धाने आपले नाव राजेश जनार्दन अष्टममकर असून कोणी जवळचे नातेवाईक नसल्याचे सांगितले. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक सुभाष दुधगांवकर यांना कळवून त्यांना भायखळ्यातील आशादान सेवाभावी संस्थेत दाखल केले. अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे अष्टमकर भांबावून गेले. उपायुक्त राजीव जैन, सहायक आयुक्त शांतीलाल जाधव यांनी या कृतीबद्दल पथकाचे कौतुक केले.

Web Title: Mumbai policeman gives warmth to the helpless and homeless old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.