मुंबई : भररस्त्यात अंगावर पेट्रोल ओतलं, पत्नीला पेटवले; महिला गंभीर जखमी

By गौरी टेंबकर | Published: June 17, 2023 08:43 AM2023-06-17T08:43:36+5:302023-06-17T08:44:08+5:30

भररस्त्यात पत्नीवर पेट्रोल ओतून तिला पेटविण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी चुनाभट्टी पोलिसांच्या हद्दीत घडला.

Mumbai poured petrol on her body set his wife on fire Woman seriously injured | मुंबई : भररस्त्यात अंगावर पेट्रोल ओतलं, पत्नीला पेटवले; महिला गंभीर जखमी

मुंबई : भररस्त्यात अंगावर पेट्रोल ओतलं, पत्नीला पेटवले; महिला गंभीर जखमी

googlenewsNext

मुंबई : भररस्त्यात पत्नीवर पेट्रोल ओतून तिला पेटविण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी चुनाभट्टी पोलिसांच्या हद्दीत घडला. महिलेला
मुलगा होत नाही म्हणून पती तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने त्याला कंटाळून ती वेगळी रहात होती. यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पती संजय ठाकूर (३७) याला अटक करण्यात आली आहे. 

संजय हा चुनाभट्टी परिसरात राहत असून गणपतीच्या मूर्ती बनविण्याचा त्याचा व्यवसाय आहे. पीडीत महिला सरितासोबत १३ वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. या दाम्पत्याला चार मुली आहेत मात्र मुलगा होत नाही म्हणून संजय तिला मारहाण करण्यासोबत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करू लागला. त्याला कंटाळून अखेर ती दीड वर्षांपासून विभक्त राहू लागली ज्याचा संजयच्या मनात राग होता. त्याने तिच्या चारित्र्यावरही संशय घेण्यास सुरुवात केली.

दरम्यान बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास संजय सरीताच्या घरी गेला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर ती कामावर जायला निघाल्यावर त्याने तिचा पाठलाग करत तिला पूर्व द्रुतगती महामार्गावरील अण्णाभाऊ साठे उड्डाणपूलाजवळ गाठले. त्यानंतर सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर ओतत तिला लायटरने पेटवले आणि पळून गेला. ही बाब स्थानिकांनी पाहिली आणि आग विझवत पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले आणि संजयच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केला प्रकरणी गुन्हा दाखल करत ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Mumbai poured petrol on her body set his wife on fire Woman seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.