मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्ग बंद नसून सुरु असल्याचे वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण; फेक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 06:12 PM2021-04-22T18:12:21+5:302021-04-22T18:14:12+5:30
Mumbai-Pune Express Highway : महाराष्ट्र वाहतूक पोलीस विभागाचे एडीजी भूषण कुमार उपाध्याय यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. तरी कोणीही मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करू नये, असे अवाहन करणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना असून गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन काळातील हा व्हिडीओ असल्याचं उघडकीस आलं आहे. वाहतूक पोलीस मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्ग वाहतुकीसाठी सुरु असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्र वाहतूक पोलीस विभागाचे एडीजी भूषण कुमार उपाध्याय यांनी हा व्हिडीओ चुकीचा असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
महाराष्ट्र वाहतूक पोलीस विभागाचे एडीजी भूषण कुमार उपाध्याय यांनी पुढे सांगितले की, कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकराने ज्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या लोकांनी पाळाव्यात अन्यथा गाईडलाईन्सचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आम्ही कडक कारवाई करू. त्यामुळे व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा असून त्यावर नागरिकांना लक्ष देऊ नये. मात्र, मुंबई- पुणे एक्सप्रेस महामार्गावर काही ठिकाणी नाकाबंदी असून अत्यावश्यक सेवेत नसलेल्या नागरिकांची कसून चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. मात्र, अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना प्रवासाची मुभा आहे.