महिलाविरोधी गुन्ह्यांत मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर, एनसीआरबीचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 07:05 AM2020-12-26T07:05:47+5:302020-12-26T07:06:26+5:30

NCRB reports : एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून, त्यात महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा समावेश आहे.

Mumbai ranks second in country in crimes against women, reports NCRB | महिलाविरोधी गुन्ह्यांत मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर, एनसीआरबीचा अहवाल

महिलाविरोधी गुन्ह्यांत मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर, एनसीआरबीचा अहवाल

Next

मुंबई : महिलांविरोधी गुन्ह्यांत महिलांविरोधी गुन्ह्यांत दिल्ली पहिल्या क्रमांकावर (१२ हजार ९०२), तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर (६ हजार ५१९) असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी)  अहवालातून समोर आली आहे. तर गुन्हेगारीत मुंबई शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला असून, त्यात महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा समावेश आहे. महिलांविरोधी गुन्ह्यांत दिल्ली पहिल्या क्रमांकावर (१२ हजार ९०२), तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर (६ हजार ५१९) आहे. नागपूर शहरात १,१४४ गुन्हे नोंद झाले. नागपूरचे गुन्हे प्रमाण मुंबईपेक्षा जास्त आहे. तसेच नागपूर शहरात महिलांविरोधी गुन्ह्यांशी संबंधित ९६ टक्के खटले प्रलंबित असून दोषसिद्धी दर १० टक्क्यांहून कमी आहे. मुंबईतला दोषसिद्धी दर ३० टक्क्यांवर आहे. 
गुन्हेगारीत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी मुंबईत ६० हजार ८२३ गुह्यांची नोंद झाली. त्यात दिल्ली (३,११,०९२) पहिल्या क्रमांकावर तर चेन्नई (७१,९४९) दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१८ मध्ये मुंबई चौथ्या क्रमांकावर होती. तर सुरत तिसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी मात्र सुरतला मागे टाकत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. गंभीर गुह्यांतही मुंबईची आघाडी कायम आहे. महिलांविरोधी गुन्ह्यांत दिल्ली पहिल्या क्रमांकावर (१२ हजार ९०२), तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर (६ हजार ५१९) आहे. त्यामुळे मुंबईत महिला असुरक्षित असल्याचे चित्र या अहवालातून समोर येत आहे.

राज्याचा दोषसिद्धी दर कमी 
धक्कादायक बाब ही की, उत्तर प्रदेश (५५.२ टक्के), राजस्थानच्या (४५ टक्के) तुलनेत राज्याचा दोषसिद्धी दर खूपच कमी (१३.७ टक्के) आहे. 

मुंबईत ‘ऑल आउट’ ऑपरेशन
मुंबईत गुन्हेगारी तसेच बेकायदेशीर कारवायांविरुद्ध मुंबई पोलिसांकडून ‘ऑल आउट’ ऑपरेशन सुरू आहे. यातून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यास मदत होईल,

राज्यातही मुंबई आघाडीवर
मुंबई     ६०,८२३
नागपूर    १८,६४७
पुणे    १६,१८१ 

Web Title: Mumbai ranks second in country in crimes against women, reports NCRB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.