मुंबई: भाजपाच्या पदाधिकाऱ्यावर मीरारोड येथे बलात्काराचा गुन्हा दाखल

By धीरज परब | Published: September 14, 2022 10:25 PM2022-09-14T22:25:10+5:302022-09-14T22:26:02+5:30

बलात्कारसह बळजबरी गर्भपात करून धमकावल्याचाही महिलेने केला आरोप

Mumbai Rape case filed against BJP office bearer at Mira Road | मुंबई: भाजपाच्या पदाधिकाऱ्यावर मीरारोड येथे बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई: भाजपाच्या पदाधिकाऱ्यावर मीरारोड येथे बलात्काराचा गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर भाजपाचा पदाधिकारी असलेल्या नवीन सिंग याच्यावर एका महिलेच्या तक्रारीवरून काशीमीरा पोलिसांनी बलात्कारसह बळजबरी गर्भपात करून धमकावल्याचा गुन्हा बुधवारी दाखल केला आहे. बुधवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी हा महिलेने तक्रार दाखल केली. पीडित महिला २५ वर्षांची असून तिला मुलगी झाली म्हणून पती वाद घालू लागल्याने ती मुलीसोबत वेगळी रहात होती. तिच्या फिर्यादीनुसार, २०२१ साली तिची ओळख फेसबुक वरून मीरारोड मधील नवीन सिंग सोबत झाली. सिंग याने तिला महिना २० हजार पगार, राहायला फ्लॅट व मुलीची जबाबदारी घेतो सांगितल्याने ती मीरारोडमध्ये आली. सिंग याने तिला फ्लॅट राहण्यास दिला व तेथून त्यांच्यात शारीरिक संबंध सुरु झाले. नगरसेवकाच्या निवडणुकीनंतर लग्न करू असे त्याने आश्वासनही दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन सिंग त्याच्या खाजगी कार्यालयात व अन्यत्रही पीडितेच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवायचा. ती गरोदर राहिली असता त्याने तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात करायला लावला. सिंग याच्या कार्यालयात अन्य एका महिलेवरून तसेच त्याने दुसरी तरुणी कामावर ठेवल्या वरून दोघात भांडण झाले होते. तिचे विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र तिच्या परिचितास पाठवून ते समाज माध्यमांवर व्हायरल करायची धमकी दिली असेही पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे.

काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे म्हणाले की, पिडितेच्या फिर्यादीनुसार नवीन सिंगवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. पीडितेने पोलीस आयुक्तांना भेटून तक्रार केली होती. तर गुन्हा दाखल व्हावा म्हणून भाजपातील एक गट तर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी भाजपातील दुसरा गट सक्रिय झाले होते अशी चर्चा आहे. 

Web Title: Mumbai Rape case filed against BJP office bearer at Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.