मुंबईच्या भरारी पथकाची खामगावात कारवाई; पाच लक्ष रुपयांची ८०० खोके दारू जप्त

By अनिल गवई | Published: August 18, 2022 03:12 PM2022-08-18T15:12:20+5:302022-08-18T15:15:11+5:30

पशुखाद्याच्या बनावट बिल्टीवर मध्यप्रदेशातून नागपूर येथे नेल्या जाणारी ८०० खोके दारू गुरूवारी जप्त करण्यात आली.

mumbai squad action in khamgaon 800 cases of liquor worth five lakh rupees seized | मुंबईच्या भरारी पथकाची खामगावात कारवाई; पाच लक्ष रुपयांची ८०० खोके दारू जप्त

मुंबईच्या भरारी पथकाची खामगावात कारवाई; पाच लक्ष रुपयांची ८०० खोके दारू जप्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: पशुखाद्याच्या बनावट बिल्टीवर मध्यप्रदेशातून नागपूर येथे नेल्या जाणारी ८०० खोके दारू गुरूवारी जप्त करण्यात आली. मुंबई येथील भरारी पथकाने गुरूवारी पहाटे ही कारवाई केली. त्यांना बुलडाणा आणि खामगाव येथील पथकाने सहकार्य केले.

मध्यप्रदेशातील एका दारू कारखान्यातून सीजी ०७ एव्ही ४४७६ या ट्रकमधून नागपूर येथे दारूची वाहतूक केली जात होती. दारूची वाहतूक करणाºया ट्रकसाठी पशुखाद्याची बनावट बिल्टी तयार करण्यात आली. तसेच पशू खाद्याच्या आत लपवून देशीदारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र भरारी पथक मुंबई यांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर त्यांनी अभिनव बानोले अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वाशिम यांना माहिती दिली. अभिनव बानोले यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून भरारी पथक व राज्य उत्पादन शुल्क बुलडाणा यांनी संयुक्त कारवाई केली. गुरूवारी अडीच वाजता दरम्यान टेंभूर्णा फाटा येथे ट्रक पकडण्यात आला. या ट्रकची तपासणी केली असता  पशू खाद्याच्या आतमध्ये मध्यप्रदेशातील दारूचे ८०० खोके मिळून आले. या दारूची किंमत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे.
 

Web Title: mumbai squad action in khamgaon 800 cases of liquor worth five lakh rupees seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.