मुंबईत होती त्याची गर्लफ्रेंड, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी बनला चोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 12:08 PM2022-11-30T12:08:47+5:302022-11-30T12:09:08+5:30

Crime News : पोलिसांनी सांगितलं की, बजरंग बहादूर सिंह याने त्याच्या गर्लफ्रेंडवर एक-दोन लाख रूपये नाहीतर 3 कोटी रूपये उडवले आहेत. पोलीस त्याच्या अनेक महिन्यांपासून शोध घेत होते.

Mumbai three crores girlfriend worth thief went to fulfill entertainment basti police | मुंबईत होती त्याची गर्लफ्रेंड, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी बनला चोर

मुंबईत होती त्याची गर्लफ्रेंड, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी बनला चोर

Next

Crime News : उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातून पोलिसांनी एका बजरंग बहादूर सिंह नावाच्या चोराला अटक केली आहे. बहादूर सिंह फारच हुशारीने ATM मधून पैसे काढत होता. चोरी आणि फसवणूकीच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशातून बहादूर सिंह मुंबईतील त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मजा-मस्ती करत होता. यात त्याला त्याचे साथीदार राजेश सिंह आणि नरसिंह मदत करत होते. पोलिसांनी सांगितलं की, बजरंग बहादूर सिंह याने त्याच्या गर्लफ्रेंडवर एक-दोन लाख रूपये नाहीतर 3 कोटी रूपये उडवले आहेत. पोलीस त्याच्या अनेक महिन्यांपासून शोध घेत होते.

छावणी पोलीस आणि एसओजी यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी मंगळवारी बजरंग बहादूर याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तुल, एक काडतूस, सफारी कार आणि 1950 रूपये ताब्यात घेतले.

तो अनेक जिल्ह्यांमध्ये ATM लुटण्याच्या तयारीत होता. त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असं सांगितलं जात आहे की, चौकशी दरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. याआधीही तो तुरूंगात गेला होता. आरोपी बजरंगने पोलिसांना सांगितलं की, तो या पैशातून त्याच्या गर्लफ्रेंडच्या इच्छा पूर्ण करत होता.

याबाबत पोलीस अधिकारी शेषमणि उपाध्याय यांनी सांगितलं की, एक गॅंग बऱ्याच दिवसांपासून हैदोस घालत होती. त्यांनी अनेकांना फसवलं आणि चोरीच्या घटना केल्या. खबऱ्याच्या माध्यमातून बजरंग बहादूर सिंह याला अटक करण्यात यश मिळालं. त्याच्या साथीदारांचा शोध घेणं सुरू आहे. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल. 

Web Title: Mumbai three crores girlfriend worth thief went to fulfill entertainment basti police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.