मुंबईत पतीनं पत्नीला चालत्या लोकलमधून ढकललं; दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

By कुणाल गवाणकर | Published: January 14, 2021 07:13 PM2021-01-14T19:13:32+5:302021-01-14T19:13:46+5:30

चेंबूर-गोवंडी स्थानकांदरम्यानची घटना; आरोपी पती अटकेत

Mumbai Woman Pushed Out Of Train By Husband Dies | मुंबईत पतीनं पत्नीला चालत्या लोकलमधून ढकललं; दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

मुंबईत पतीनं पत्नीला चालत्या लोकलमधून ढकललं; दोन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

Next

मुंबई: एका २६ वर्षीय महिलेला तिच्या पतीनं लोकलमधून ढकलून दिल्याची घटना घडली आहे. महिला लोकलच्या दरवाज्यात उभी असताना तिच्या पतीनं तिला धक्का दिला. चेंबूर-गोवंडी दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. लोकलमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेनं हा प्रकार पाहिला. तिनं याची माहिती पोलिसांना दिल्यानं पतीला अटक झाली.

पतीनं पत्नीला लोकलमधून ढकलून दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. 'अटकेत असलेला आरोपी ३१ वर्षांचा असून तो त्याच्या पत्नीसोबत मानखुर्दमध्ये वास्तव्यात होता. ते दोघेही मजुरी करायचे. दोनच महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. सोमवारी लोकलमधून प्रवास करत असताना आरोपीनं पत्नीला खाली ढकललं. त्यावेळी महिलेची ७ वर्षांची मुलगी त्यांच्यासोबत होती. ती मुलगी तिला पहिल्या पतीपासून झाली होती,' अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकलमधून प्रवास करताना महिला दरवाज्याजवळ उभी होती. ती दरवाज्यातून थोडीशी वाकली. त्यावेळी तिला पतीनं धरलं होतं. मात्र त्यानं अचानक तिला सोडून दिलं. त्यामुळे ती चालत्या लोकलमधून खाली पडली. हा प्रकार लोकलमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेनं पाहिला. तिनं याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर लगेचच आरोपीला अटक करण्यात आली.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिच्या अंगावर अनेक जखमा होत्या. पोलिसांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण तिचा मृत्यू झाला. सध्या महिलेचा पती अटकेत आहे. त्यानं अंमली पदार्थांचं सेवन करून हे कृत्य केलं का, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी मृत महिलेच्या ७ वर्षीय मुलीला तिच्या नातेवाईकांकडे सोपवलं आहे.
 

Web Title: Mumbai Woman Pushed Out Of Train By Husband Dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.