महाराजा थाळी पडली महागात! अवघ्या 200 रुपयांच्या ऑफरने महिलेला घातला 8 लाखांचा गंडा अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 02:22 PM2022-10-22T14:22:41+5:302022-10-22T14:31:19+5:30
साधारणपणे 1200 ते 1500 रुपयांची महाराजा भोग थाळी अवघ्या 200 रुपयांमध्ये मिळत असल्याच्या आमिषाला महिला बळी पडली आणि तब्बल 8 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
महाराजा भोग थाळी एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. थाळीच्या लोभापायी एक महिला सायबर फ्रॉडची शिकार झाली आहे. साधारणपणे 1200 ते 1500 रुपयांची महाराजा भोग थाळी अवघ्या 200 रुपयांमध्ये मिळत असल्याच्या आमिषाला महिला बळी पडली आणि तब्बल 8 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, 54 वर्षीय महिलेने सोशल मीडियावर 200 रुपयांची 1+1 ऑफर पाहिल्यानंतर लिंकवर क्लिक केले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एकामागून एक 27 ट्रान्झेक्शन झाले. खात्यातून आठ लाखांहून अधिक रुपये ट्रान्सफर झाली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिच्याकडे काही सेविंग्स आणि शेअर्स आहेत. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तिला फेसबुकवर महाराजा भोग थाळीची जाहिरात आली. त्यांनी लिंकवर क्लिक केले. यामध्ये बँक डिटेल्स आणि मोबाईल नंबर भरण्यास सांगितले होते. त्यांनी डिटेल्स भरले. तेवढ्यात त्यांना फोन आला. त्यानंतर मेसेजमध्ये दुसरी लिंक आली. ज्याचा वापर त्या त्यांच्या बँक सोबतच डेबिट कार्डच्या डिटेल्ससाठी करायची.
फसवणूक करणार्याने नंतर झोहो असिस्ट हे रिमोट एक्सेस एप डाउनलोड केले आणि इन्स्टॉल केले, ज्याचा वापर त्यांच्या फोनवर पाठवलेल्या वन-टाइम पासवर्ड वाचण्यासाठी केला गेला. फसवणूक करणाऱ्याने 27 व्यवहारांमध्ये त्यांच्या खात्यातून आठ लाख 46 हजार रुपये ट्रान्सफर केल्याचं समोर आलं आहे.
खात्यातून वेगाने पैसे ट्रान्सफर होत असल्याचे पाहून महिला अस्वस्थ झाली. तिने लगेच बँक गाठली. गुरुवारी 24 व्यवहार झाले. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 419 आणि 420 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 सी आणि 66 डी अंतर्गतही तक्रार नोंदवण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"