मुंबईच्या हाई प्रोफाइल ऑर्केस्ट्रा गर्लला अटक, चोरी करून बनली करोडपती 

By पूनम अपराज | Published: December 21, 2020 08:40 PM2020-12-21T20:40:04+5:302020-12-21T20:40:45+5:30

Crime News : वरिष्ठ निरीक्षक जगदीश साईल आणि योगेश चव्हाण यांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी तिला बंगळुरू येथून अटक केली.

Mumbai's high profile orchestra girl arrested, became a crorepati by stealing | मुंबईच्या हाई प्रोफाइल ऑर्केस्ट्रा गर्लला अटक, चोरी करून बनली करोडपती 

मुंबईच्या हाई प्रोफाइल ऑर्केस्ट्रा गर्लला अटक, चोरी करून बनली करोडपती 

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत तिच्याविरूद्ध देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ९ गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व घटनांमध्ये तिने १० ते २० लाख रुपयांची चोरी केली आहे.

४६ वर्षीय मुनमुन हुसेन उर्फ अर्चना बरुआ उर्फ निक्की ही पेशाने एक ऑर्केस्ट्रा गर्ल आहे, परंतु तिच्या कमाईचा खरा स्त्रोत चोरी आहे. या चोरीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत ती कोट्याधीश झाली. वरिष्ठ निरीक्षक जगदीश साईल आणि योगेश चव्हाण यांच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी तिला बंगळुरू येथून अटक केली.

ज्या प्रकरणात तिला पकडले गेले आहे ती लोअर परळच्या फिनिक्स मॉलशी संबंधित आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या महिलेच्या कुटुंबात लग्न होते. तिने बॅंकेच्या लॉकरमधून सुमारे १३ लाखांची दागिने आणले आणि बॅगमध्ये ठेवली. बॅगमध्ये काही रोकडही होती. त्या महिलेला फिनिक्स मॉलमध्ये काही कपडे विकत घ्यावे लागले. त्यामुळे तिने ती बॅग काही काळ आपल्या मुलाकडे दिली. मुलाला कोणाचा तरी फोन आला. त्याने ती बॅग खाली ठेवली आणि बोलण्यात मग्न झाला. त्याचवेळी मुनमुनने ती बॅग उचलली आणि ती तिथून गायब झाली.



९ गुन्हे दाखल

या घटनेच्या काही दिवस आधी दादरच्या शिवाजी पार्क येथे याच मोडस ऑपरेंडीप्रमाणे चोरी झाली होती. क्राइम ब्रँचने दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा दोन्ही ठिकाणी तीच महिला दिसली. तेव्हापासून पोलीस तपास करत होता. दोन दिवसांपूर्वी मुनमुनला बंगळुरूमध्ये असल्याची माहिती मिळाली, तेथूनच तिचा शोध लागला. आतापर्यंत तिच्याविरूद्ध देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ९ गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व घटनांमध्ये तिने १० ते २० लाख रुपयांची चोरी केली आहे.

दागदागिने अशा प्रकारे ठेवत होती तारण 

 तिच्या घरात असलेल्या एकाला कर्करोग झाला असून त्याला उपचारासाठी रोख रकमेची गरज असल्याचे बतावणी करून ती चोरी केलेले दागिने तारण ठेवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती मूळची कोलकाताची आहे. ती खूप छान गाते. काही काळ तिने मुंबईत काम शोधले. नंतर ती बंगळुरूमधील एका ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये सामील झाली आणि तेथील बारमध्ये काम करू लागली. ती चोरीसाठी फ्लाईटवर येत होती

Web Title: Mumbai's high profile orchestra girl arrested, became a crorepati by stealing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.