"माझे मम्मी-पप्पा कुठे गेलेत?"; मुस्कानच्या चिमुकल्या लेकीचा प्रश्न, आजी देते 'हे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 18:20 IST2025-04-04T18:19:28+5:302025-04-04T18:20:00+5:30
सौरभ राजपूत हत्याकांडात आरोपी मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल जेलमध्ये आहेत.

"माझे मम्मी-पप्पा कुठे गेलेत?"; मुस्कानच्या चिमुकल्या लेकीचा प्रश्न, आजी देते 'हे' उत्तर
मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडात आरोपी मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल जेलमध्ये आहेत. याच दरम्यान सौरभचे कुटुंबीय त्याच्या मुलीचा ताबा देण्याची मागणी करत आहेत. मात्र मुस्कानच्या पालकांनी काहीही झालं तरी नातीला देणार नाही असं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत सौरभचा भाऊ बबलूने प्रतिक्रिया दिली आहे. मुस्कानला तिच्या आईवडिलांनी काय संस्कार दिले. आमच्या मुलीवर असेच चुकीचे संस्कार करतील असं म्हटलं आहे.
बबलूने दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला सौरभच्या मुलीला मुस्कानच्या पालकांसोबत ठेवायचं नाही. कारण त्यांच्या घरातील वातावरण खूप खराब आहे. त्यांनी त्यांच्या मुलीला असं वाढवलं असेल तर ते सौरभच्या मुलीला कसं वाढवतील हे माहित नाही. आम्ही अनेक वेळा पोलिसांकडे मुलीला आमच्याकडे सोपवण्याची मागणी केली. सध्या तरी कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. मुस्कानचे पालकही मुलीला देण्यास तयार नाहीत.
मुस्कानची आई कविता रस्तोगी म्हणाली की, "मुलगी ६ वर्षांपासून आमच्यासोबत राहत आहे. आम्ही तिच्याशिवाय जगू शकत नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुलीला दुसऱ्या कोणाच्याही ताब्यात देणार नाही. ती नेहमीच आमच्यासोबत राहिली आहे. मुलगी सौरभच्या कुटुंबासोबत कधी २ तासही राहिली नाही. ती सध्या तिच्या मम्मी-पप्पांची आठवण काढत आहे."
"एका लहान मुलीच्या मनावर जास्त प्रेशर टाकणं योग्य नाही. मुलगी आम्हाला सतत तिच्या पालकांबद्दल विचारते, माझे मम्मी-पप्पा कुठे गेलेत असा तिचा प्रश्न असतो. तेव्हा आम्ही तिला सांगतो की, तिचे मम्मी-पप्पा हे लंडनला फिरण्यासाठी गेले आहेत. त्यानंतर तिचं दुसऱ्या गोष्टीकडे मन वळवतो. आम्ही मुस्कानला पाठिंबा देत नाही. तिचं समर्थन करत नाही, उलट तिला कठोर शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे."