महापालिकेच्या सहायक आयुक्त अनिल खतूरानी याला लाच घेतल्याप्रकरणी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 09:19 PM2021-12-27T21:19:04+5:302021-12-27T21:19:59+5:30
Bribe Case : पडताळणीमध्ये लोकसेवक अनिल खथुरानी, यांनी त्यांचे प्रभागामध्ये चालू असलेल्या इतर बांधकामे सुरू ठेवणे करिता, तक्रारदार यांचेकडून ५० हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली. यापूर्वी २५ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले, उर्वरित २५, हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती क्रं-२ चे सहायक आयुक्त अनिल खतुरानी याला प्रभाग कार्यालयात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ हजाराची लाच घेतल्या प्रकरणी अटक केली. गेल्याच आठवड्यात महापालिकेचे प्रभारी वाहन व्यवस्थापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.
उल्हासनगर महापालिकेत प्रभारी अधिकाऱ्यांची मक्तेदारी पुन्हा उघड झाली. महापालिका प्रभाग समिती क्रं-३ चे प्रभारी सहाय्यक आयुक्त अनिल खतूरानी यांनी प्रभाग क्षेत्रात अवैध बांधकामे सुरू ठेवण्यासाठी ५० हजाराची लाचेची मागणी करून यापूर्वी २५ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. तसेच उर्वरित २५ हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली. अखेर तक्रारदारांनी १ डिसेंबर रोजी लाचेची मागणी केल्याची तक्रार केल्यावर, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २ डिसेंबर रोजी याबाबत पडताळणी केली. पडताळणीमध्ये लोकसेवक अनिल खथुरानी, यांनी त्यांचे प्रभागामध्ये चालू असलेल्या इतर बांधकामे सुरू ठेवणे करिता, तक्रारदार यांचेकडून ५० हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केली. यापूर्वी २५ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले, उर्वरित २५, हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोमवारी दुपारी अड्डीच वाजण्याच्या दरम्यान प्रभाग समिती कार्यालयातून अनिल खतूरानी यांना अटक केली. एका महिन्यात दोन प्रभारी अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्याने, महापालिका कारभाराचे वाभाडे निघाले आहे. तसेच अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे