सांगलीत सव्वा लाखांची लाच घेताना महापालिकेचा अग्निशमन अधिकारी जाळ्यात

By शरद जाधव | Published: June 27, 2023 09:26 PM2023-06-27T21:26:05+5:302023-06-27T21:27:42+5:30

‘लाचलुचपत’ची कारवाई; दाखला देण्यासाठी मागितली लाच

Municipal fire officer caught in Sangli for taking bribe of Rs 1 lac | सांगलीत सव्वा लाखांची लाच घेताना महापालिकेचा अग्निशमन अधिकारी जाळ्यात

सांगलीत सव्वा लाखांची लाच घेताना महापालिकेचा अग्निशमन अधिकारी जाळ्यात

googlenewsNext

सांगली : फायरफायटिंग सिस्टीम बसविल्याच्या कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात एक लाख २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना महापालिकेच्या प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. विजय आनंदराव पवार (वय ५०, रा. संभाजीनगर, त्रिमुर्ती कॉलनी, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टिंबर एरिया येथील अग्नीशमन विभागाच्या कार्यालयात मंगळवारी सापळा लावून ही कारवाई केली.

तक्रारदाराच्या कंपनीकडून फायरफायटिंग सिस्टीम बसविण्याची कामे केली जातात. अशाच एका कामाचा अंतिम दाखला देण्याच्या मोबदल्यात पवार याने दिड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पैसे न दिल्यास कंपनीकडून करण्यात येणाऱ्या पुढील कामाची दाखले देणार नाही असेही पवार याने सांगितले होते. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पवार याने दिड लाख रुपयांची मागणी करत तडजोडीअंती सव्वा लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.

मंगळवारी टिंबर एरिया येथील अग्नीशमन व आणीबाणी सेवा विभाग कार्यालयात सापळा लावून लाचेची सव्वा लाखांची रक्कम स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
‘लाचलुचपत’चे उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अजित पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रविंद्र धुमाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कोणत्याही शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्याने कामासाठी पैशाची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. याबाबत तक्रार आल्यानंतर पडताळणी करून त्यावर कारवाई करण्यात येईल, असे उपअधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

Web Title: Municipal fire officer caught in Sangli for taking bribe of Rs 1 lac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.